क्रिकेटमधील वनडे प्रकाराची विश्वचषक स्पर्धा दर ४ वर्षांनी येते. खेळाडू म्हणून या स्पर्धेत भाग घेणं जेवढं मोठं समजलं जातं तेवढंच मोठं एखाद्या संघाचं प्रशिक्षक म्हणुन विश्वचषक खेळणंही समजलं जातं.
संघातून १५ खेळाडू विश्वचषकासाठी जातात, परंतु प्रत्येक संघाकडून केवळ एक मुख्य प्रशिक्षक विश्वचषकासाठी असतो. खेळाडू म्हणून तुम्हाला विश्वचषकात २-३ वेळा तरी संधी मिळतात. परंतु प्रशिक्षक म्हणून एवढ्या संधी मिळतीलच असे नाही.
त्यामुळे विश्वचषक खेळाडू व प्रशिक्षक म्हणून जिंकणारे केवळ २ खेळाडू आहेत. Cricket World Cup History: 2 players who won the tournament as both player and coach.
या लेखात आपण त्यांची ओळख करुन घेणार आहोत.
२. जेफ माॅर्श (Geoff Marsh, Australia)
जेफ मार्श यांनी ऑस्ट्रेलियाकडून साल १९८५ ते १९९२ या काळात बरोबर ५० कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी २८५४ धावा केल्या. तसेच वनडेत ११७ सामन्यात ३९.९७च्या सरासरीने २८५४ धावा केल्या आहेत. नंतर त्यांनी प्रशिक्षक आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या. ते २०१४ मध्ये केवळ तिसरे क्रिकेटपटू ठरले ज्यांच्या २ मुलांनी देशासाठी क्रिकेट खेळले.
माॅर्श यांनी साल १९८७ व १९९२ असे दोन विश्वचषक खेळले. यातील १९८७चा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. १९९२ विश्वचषकात माॅर्श यांनी ८ सामन्यात ६१.१४च्या सरासरीने ४२८ धावा केल्या होत्या. या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संघसहकारी डेविड बून व ग्रॅहम गुचनंतर ते तिसऱ्या स्थानावर होते. १९९२ विश्वचषकात मात्र त्यांना मोठी कामगिरी करता आली नाही.
साल १९९४ला क्रिकेटला अलविदा केल्यानंतर त्यांनी १९९६ साली क्रिकेट ऑस्ट्रेलीयाचे प्रशिक्षक पद स्विकारले. ते प्रशिक्षक असतानाच ऑस्ट्रेलियाने १९९९साली विश्वचषकावर आपले नाव कोरले. याचबरोबर खेळाडू व प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकणारे ते पहिले खेळाडू ठरले.
१. डॅरेन लेहमन (Darren Lehmann, Australia)
डॅरेन लेहमन यांनी साल १९९९ व २००३ असे दोन विश्वचषक जिंकले आहेत. त्यांनी विश्वचषकात एकूण १९ सामन्यात ३२.७२च्या सरासरीने ३६० धावा केल्या. २००३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्यांना फलंदाजी मिळाली नव्हती. तर १९९९च्या विश्वचषकात चौकार मारत लेहमन यांनीच विजयी धाव घेतली होती.
असे असले तरी १९९९ विश्वचषकात लेहमन यांची फलंदाज म्हणून कामगिरी ठिकठाक राहिली. त्यांनी १९९९ विश्वचषकात ९ सामन्यातील ८ डावात २२.६६च्या सरासरीने त्यांनी १३६ धावा केल्या तर २००३ विश्वचषकात मात्र त्यांनी सर्व भरपाई केली. या विश्वचषकात त्यांनी १० सामन्यात ८ डावात ४४.८०च्या सरासरीने २२४ धावा केल्या.
साल १९९६ ते २००५ या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले लेहमन २०१३मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक झाले. दोन एशेज मालिका जिंकल्यांनंतर त्यांनी २०१५ विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. या विश्वचषकात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने ५व्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. याबरोबर दोन विश्वचषक खेळाडू म्हणून तर एक प्रशिक्षक म्हणून जिंकणारे लेहमन पृथ्वीवरील पहिले व्यक्ती ठरले.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण