शुक्रवारपासून (दि. 16 जून) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिका 2023 ची सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पहिल्या डावात इंग्लंडने वादळी फलंदाजीच्या जोरावर 393 धावा करत डावही घोषित केला. इंग्लंडला एवढा मोठा धावांचा डोंगर उभारण्यात मदत करणारा पठ्ठ्या दुसरा-तिसरा कुणी नसून जो रूट आहे. रूटने कसोटी कारकीर्दीतील 30वे शतक झळकावत 118 धावांची नाबाद खेळी साकारली. या शतकासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
जो रूटचा विक्रम
जो रूट (Joe Root) याने सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली (Virat Kohli) याच्यानंतर दुसरा क्रमांक पटकावला. या यादीत त्याने डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांना पछाडले. विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 75 शतके आहेत. तसेच, रूट 46 शतकांसह दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. रूटपाठोपाठ 45 शतकांसह डेविड वॉर्नर (David Warner) तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे दोघेही संयुक्तरीत्या चौथ्या स्थानी आहेत. त्यांच्या नावावर प्रत्येकी 43 शतके आहेत.
सर्वाधिक शतके झळकावणारे सक्रिय क्रिकेटपटू
75- विराट कोहली
46- जो रूट*
45- डेविड वॉर्नर
43- स्टीव्ह स्मिथ
43- रोहित शर्मा
याव्यतिरिक्त फॅब 4मध्ये सर्वाधिक कसोटी शतके झळकाणाऱ्या फलंदाजांविषयी बोलायचं झालं, तर रूट स्मिथच्या खूपच जवळ पोहोचला आहे. रूटच्या नावावर कसोटीत 30 शतके आहेत, तर स्मिथ 31 कसोटी शतकांसह अव्वलस्थानी आहे. तसेच, या यादीत केन विलियम्सन (Kane Williamson) आणि विराट कोहली संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहेत.
Test century No. 3⃣0⃣ for Joe Root ????#Ashes | #WTC25 | ????: https://t.co/ZNnKIn9jeq pic.twitter.com/OhEK67TsGQ
— ICC (@ICC) June 16, 2023
कसोटीत फॅब- 4ची सर्वाधिक शतके
31- स्टीव्ह स्मिथ
30- जो रूट*
28- केन विलियम्सन
28- विराट कोहली
तसं पाहिलं, तर 2021नंतर फॅब- 4पैकी रूटने चांगलाच वेग पकडला आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी या यादीत रूट 17 शतकांसह चौथ्या स्थानी होता. मात्र, त्याने आता मोठी गरुडझेप घेतली आहे. यादीतील इतर तीन खेळाडूंविषयी बोलायचं झालं, तर 2021च्या सुरुवातीला स्मिथच्यान नावावर 26, विलियम्सनच्या नावावर 24 आणि किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटच्या नावावर 27 शतकांचा समावेश होता. विराटला मागील दोन वर्षांमध्ये कसोटीत शतक झळकावता आले नाहीये. (cricketer joe root most international hundreds among active players list virat kohli on top know the list)
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! बाऊंड्री लाईनवर झेप घेत पठ्ठ्याने एका हाताने पकडला झेल, असा Catch तुम्ही कधीच पाहिला नसेल
रूटने भिरकावला खणखणीत रिव्हर्स स्कूप षटकार, पाहून बोलँडच्याही चेहऱ्याचा उडाला रंग- व्हिडिओ