जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेली टी२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग. आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करून युवा खेळाडू आपली छाप पाडतात. यामुळे खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळते. असेच काहीसे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजबद्दल झाले. जवळपास मागील दोन वर्षांपासून सिराजचे कायापालट झाले आहे. आयपीएल २०२०मध्ये केलेल्या अफलातून कामगिरीनंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. आता तो भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीतील प्रमुख गोलंदाज आहे. मात्र, जेव्हा भारतीय संघ २०२०-२१ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता, तेव्हा मोहम्मद सिराज पूर्णपणे खचला होता. या दौऱ्यावर त्याने स्वत:ला सिद्ध केले होते.
झाले असे होते की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिराजला (Mohammed Siraj) त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली होती. त्यावेळी तो पूर्णपणे खचला होता. मात्र, त्यावेळी त्याला कोणी सांभाळले आणि कोणी त्याच्यात प्रेरणा जागवली होती? हे तुम्हाला माहिती आहे का? खुद्द सिराजनेच त्या व्यक्तीचे नाव सांगितले आहे. सिराजने सांगितले की, तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) त्याला सावरले होते आणि त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंमत दिली होती.
Mohammed Siraj provided a glimpse of what it means to represent your country in international cricket ✨#AUSvINDpic.twitter.com/HpL94QH5pr
— ICC (@ICC) January 7, 2021
सिराजने हा खुलासा ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या चॅट शोदरम्यान केला. तो म्हणाला की, “जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले होते, तेव्हा रवी शास्त्री सरांनी माझी साथ दिली होती. ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले, ‘हे पाहा, तुझ्या वडिलांची इच्छा असेल की, तू या दौऱ्यात ५ विकेट्स घ्याव्या.’ मी त्यावेळी खूप भावूक, उदास आणि खचलो होतो. मला समजत नव्हते की काय सुरू आहे. त्यावेळी आम्ही कठोर क्वारंटाईनमध्येही होतो.”
Part 3:
He bowled superbly in Australia and England. He bowls with the same energy whether it’s the first ball of the day or last. Watch @mdsirajofficial talk about his life on and off the field.#BWB @AgeasFederal @Just_My_Roots @OfficialFanatic pic.twitter.com/llta2FrMyr— Boria Majumdar (@BoriaMajumdar) March 17, 2022
पुढे बोलताना तो म्हणाला की, “मला समजत नव्हते की, काय करावे. घरी गेले पाहिजे की, इथेच राहिलं पाहिजे आणि माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केले पाहिजे. त्यानंतर मी विचार केला की, जर मी परत गेलो, तर मला तिथेही क्वारंटाईनचा सामना करावा लागला असता. त्यामुळे मी विचार केला की, त्यापेक्षा चांगलं हे होईल की, मी ऑस्ट्रेलियातच राहू आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करू.”
निश्चितच सिराज आज ज्या ठिकाणी आहे, त्याचा त्याच्या कुटुंबासोबतच चाहत्यांनाही अभिमान आहे. दुसरीकडे, जर रवी शास्त्रींनी सिराजला त्यावेळी हिंमत आणि प्रेरणा दिली नसती, तर कदाचित सिराज त्या दौऱ्यातून रिकाम्या हाताने परतला असता. अशात शास्त्रींचे एका प्रशिक्षकाच्या रूपातील योगदानही विसरले नाही पाहिजे. सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ सामने खेळताना १३ विकेट्स घेतल्या होत्या. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता.
Mohammed Siraj on why he got so emotional while the National Anthem was being played at the SCG.#TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/zo0Wc8h14A
— BCCI (@BCCI) January 7, 2021
सिराजच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत १२ कसोटी सामने, ४ वनडे सामने आणि ५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ३.०९च्या इकॉनॉमी रेटने ३६ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने ४.६९च्या इकॉनॉमी रेटने ५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय टी२०तही त्याने १०.४५च्या इकॉनॉमी रेटने ५ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराटने कर्णधारपद सोडणे विरोधी संघासाठी धोक्याची घंटी’, असे का म्हणाला ग्लेन मॅक्सवेल? घ्या जाणून
पंड्या बंधू खेळणार वेगवेगळ्या आयपीएल संघांकडून, हार्दिकची वहिनीने शेअर केला भावूक व्हिडिओ
काय आहे एमएस धोनीच्या ‘जर्सी नंबर- ७’चे रहस्य? खुद्द ‘माही’नेच केलाय खुलासा