सध्या भारतीय क्रिकेट संघात लग्नाचा हंगाम सुरू आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून भारतीय संघातील दोन सदस्यांनी आपला विवाह उरकला. भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल व अष्टपैलू अक्षर पटेल हे काही दिवसांपूर्वीच विवाह बंधनात अडकले. त्यानंतर भारतीय संघाचा आणखी एक सदस्य अष्टपैलू शार्दुल ठाकूर हा देखील आता लग्न उरकणार आहे. त्याची वधू मिताली हीने स्वतः ही माहिती दिली.
भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल याने नुकतीच अभिनेत्री आथिया शेट्टीशी विवाह उरकला. त्यानंतर अष्टपैलू अक्षर पटेल याने आपली गर्लफ्रेंड नेहा पटेल हिच्याशी विवाह केला. त्यानंतर आता शार्दुल ठाकूर हा देखील सोमवारी (27 फेब्रुवारी) विवाह बंधनात अडकेल. हे लग्न मुंबई जवळील एका ठिकाणी होणार असल्याचे सांगितले जाते.
शार्दुलने त्याची मैत्रीण मिताली पारूळकर हिच्याशी नोव्हेंबर 2021 मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर 2022 टी20 विश्वचषकानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही कारणास्तव त्यावेळी हा विवाह होऊ शकला नाही. या जोडप्याला गोवा येथे डेस्टिनेशन वेडिंग करायची होती. परंतु, कौटुंबिक कारणाने हे लग्न आता मुंबई जवळीलच एका ठिकाणी होणार असल्याचे समजते. स्वतः मितालीने एका मुलाखतीत ही माहिती दिली. या लग्नाला जवळचे 200-250 लोक उपस्थित राहतील.
मिताली ही एक बेकर आहे. तसेच यापूर्वी ती काही कंपन्यांची सेक्रेटरी देखील राहिली होती. तिने काही काळ मॉडेलिंग देखील केली होती. आपल्या लग्नात ती स्वतः केक डिझाईन करणार असल्याचे माध्यमांतून समजत आहे. शार्दुलने नुकतेच आपल्या सोशल मीडिया हँडलवरून दोघांची काही छायाचित्रे पोस्ट केली होती.
(Cricketer Shardul Thakur Tie Marriage Knot With His Friend Mitali Parulkar On 27 February)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेन वॉर्नचा कसोटी रेकॉर्ड तोडण्यासाठी अँडरसन सज्ज! हव्या आहेत फक्त ‘एवढ्या’ विकेट्स
‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने अजिंक्य रहाणेला मागितली मदत, फलंदाजी पाहून झालेला हैराण