इंडियन प्रीमियर लीग २०२० चा अर्धा प्रवास जवळजवळ पूर्ण झाला आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना झाला. या सामन्यानंतर आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत २८ सामने खेळले गेले आहेत. या स्पर्धेत एकूण ५६ सामने आहेत.
आयपीएल २०२० चा पॉइंट्स टेबल आश्चर्यचकित करणारा आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे यंदा युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात चाहत्यांना अनेक प्रकारचे रोमांचक सामने पाहायला मिळाली आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघ उपांत्य फेरीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. त्याचबरोबर तीन वेळा चॅम्पियन झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची अवस्था फारच बिकट आहे. यावेळी प्ले ऑफमध्ये पात्र ठरणे सीएसकेला फार कठीण जाणार आहे.
आयपीएल २०२० च्या आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स ७ सामन्यांत ५ विजयांसह अव्वल स्थानी आहेत. मुंबई इंडियन्सचे १० गुण आणि नेट रन रेट +१.३२७ आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स संघ दुसर्या क्रमांकावर असून मुंबईला जोरदार स्पर्धा देत आहे. दिल्लीने आतापर्यंतच्या ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. दिल्लीचेही १० गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रनरेट +१.०३८ आहे.
केकेआर आणि आरसीबीही चांगली कामगिरी करत आहेत-
सोमवारी झालेल्या सामन्यात आरसीबी संघाने केकेआर संघावर ८२ धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत संमिश्र कामगिरी करणारा कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ सामन्यांत ४ विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. केकेआरचा नेट रनरेट -०.५७७ आणि ८ गुण आहेत. तर विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आतापर्यंत एकाही आयपीएलमध्ये विजेतेपद जिंकू शकला नाही. आरसीबी १० गुणांसह -०.११६ नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानी आला आहे.
हैदराबाद आणि राजस्थानमध्ये स्पर्धा चालू आहे
सनरायझर्स हैदराबाद ७ पैकी ३ सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. संघाचा नेट रनरेट +०.१५३ आणि ६ गुण आहेत. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ सलग पराभवानंतर विजयाच्या मार्गावर परतला आहे. राजस्थान संघाने ७ सामन्यांपैकी ३ विजयांसह सहाव्या स्थानावर आहे. संघाचे गुण ६ असून -०.८७२ नेट रनरेट आहे.
पिछाडीवर राहिला तीन-वेळा विजेता ठरलेला सीएसके संघ
आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या प्रवासात चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघ सर्वात खराब स्थितीत आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून हंगामाची विजयी सुरुवात केली. त्यानंतर संघाची कामगिरी अत्यंत खराब होत गेली. प्रत्येकवेळी प्ले ऑफ व ८ वेळा अंतिम फेरी गाठणारा सीएसके संघ यंदा पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. सीएसकेने आतापर्यंत ७ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. संघाचा नेट रनरेट -०.५८८ आहे आणि ४ गुण आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघ सर्वात शेवटच्या स्थानी
केएल राहुलच्या नेतृत्वात किंग्ज इलेव्हन पंजाब संघ गुणतालिकेच्या सर्वात शेवटच्या स्थानी आहे. या संघाने ७ सामने खेळले असून केवळ १ सामना जिंकला आहे. संघाचा नेट रनरेट -०.३८१ आहे तर २ गुण आहेत. केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी मोठमोठ्या खेळी करून मोठी धावसंख्या उभारल्या तरी संघ सामना जिंकण्यात अपयशी ठरला आहे. पंजाबला एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही आणि यंदाची कामगिरी पाहून संघाला या हंगामात जिंकणे अवघड आहे.
केएल राहुल ऑरेंज कॅप शर्यतीत आघाडीवर
किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आयपीएल २०२० च्या गुणतालिकेत सर्वात शेवटी असला तरी ऑरेंज कॅप शर्यतीत संघातील सलामीवीर पहिल्या दोन स्थानांवर आहेत. ऑरेंज कॅप शर्यतीत पंजाबचा कर्णधार केएल राहुलने ७ सामन्यांत ६४.५० च्या सरासरीने ३८७ धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ पंजाबचा सलामीवीर मयंक अग्रवालने ७ सामन्यांत ४८.१४ च्या सरासरीने ३३७ धावा केल्या आहेत. तिसर्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा फाफ डुप्ली आहे. डुप्लेकीने ७ सामन्यांत ६१.४० च्या सरासरीने ३०७ धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ७ सामन्यांत ३९.२८ च्या सरासरीने २७५ धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर हैदराबादचा जॉनी बेयरस्टो आहे. त्याने २६.७१ च्या सरासरीने २५७ धावा केल्या आहेत.
पर्पल कॅपच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटलचा कॅगिसो रबाडा आघाडीवर
आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कागिसो रबाडा सर्वाधिक विकेट्ससह पर्पल कॅप शर्यतीत आघाडीवर आहे. रबाडाने आतापर्यंत ७ सामन्यांत ७.६९ च्या इकोनॉमी रेट ने १७ विकेट्स घेतल्या आहेत. दुसर्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आहे. त्याने ७.९२ च्या इकोनॉमी रेट ने आतापर्यंत ७ सामन्यांत ११ गडी बाद केले आहेत, तर ८.०१ च्या इकोनॉमी रेट ने ११ विकेट्ससह मुंबईचा ट्रेंट बोल्ट तिसर्या क्रमांकावर आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या राशिद खानने ५.०३ इकॉनॉमी रेटने १० गडी बाद केले असून तो चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर किंग्ज इलेव्हन पंजाबचा मोहम्मद शमी असून त्याने ८.३६ च्या इकोनॉमी रेट ने १० गडी बाद केले आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: बेंगलोरने कोलकाताविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर अशी आहे गुणतालिका
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?
महत्त्वाच्या बातम्या-
-“१० कोटी नाही तर त्याची किंमत…”, माजी भारतीय क्रिकेटरने साधला मॅक्सवेलवर निशाना
-गेम आहे मिलीमीटर! फक्त काही इंचांनी हुकला मॅक्सवेलचा षटकार नाहीतर…
-वाढदिवशी शुबमनकडून साराला नाही मिळालं हवं ते गिफ्ट, मग काय झालं नक्कीच पाहा