दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या (सीएसए) संपूर्ण अधिकाऱ्यांनी नुकतेच राजीनामे दिले आहेत. अशा परिस्थितीत सीएसएने चाहत्यांसाठी दक्षिण आफ्रिकेत होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम जाहीर केला आहे. 2020-21 च्या हंगामात इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघ सहभागी होतील.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग (सीडब्ल्यूसीएसएल) किंवा आयसीसी विश्वचषक चँपियनशिप (डब्ल्यूटीसी) यामध्ये महत्त्वाचे गुण मिळवण्यासाठी संघ प्रयत्न करणार आहेत.
हंगामाची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसह होईल. केप टाउन आणि पर्ल येथे 3 टी20 आणि 3 वनडे सामने खेळले जातील. त्यानंतर श्रीलंका संघ सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे. पारंपारिक बॉक्सिंग डे कसोटी आणि नवीन वर्षात होणाऱ्या कसोटी सामन्यांचा समावेश या लीगमध्ये केला जाईल.
ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी 2021 मध्ये कसोटी सामन्याची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल होणार आहे.
पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर एप्रिल 2021 मध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका आणि तीन टी20 सामन्याची मालिका खेळणार आहे.
“सन 2007 नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिका पाकिस्तान दौर्यावर येत आहे. त्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी एक शिष्टमंडळ स्थापन करण्यात येईल.” अशी पुष्टी सीएसएने केली आहे.
हे शिष्टमंडळ या आठवड्याच्या शेवटी पाकिस्तानला रवाना होईल आणि 2021 च्या सुरुवातीच्या काळात प्रस्तावित दौऱ्याबाबत निष्कर्ष कळवतील.
सीएसएचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी कुगंद्री गोवेन्डर हिने सांगितले की “दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आम्हाला आनंद झाला. क्रिकेट चाहत्यांना पुढील आठवड्यात इंग्लंडविरुद्धचा दौरा आणि देशात होणारा हंगाम सुरू होण्याच्या संदर्भात बातमी देण्यात आनंद होत आहे.”
“कोव्हिड-19 या साथीच्या रोगामुळे दक्षिण आफ्रिकेत होणारा हंगाम, आयसीसी फ्यूचर टूर्स प्रोग्राम (एफटीपी) यामध्ये अनेक बदल करण्यास भाग पाडले आहे. म्हणूनच ही घोषणा करताना मला विशेष अभिमान आहे. शेवटी, मी सीएसएच्या वतीने इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या मंडळाचे या दौऱ्यासाठी केलेल्या कराराबद्दल आभार मानते. दक्षिण आफ्रिकेच्या लोकांपर्यंत खेळ पोहोचवण्यात आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करू इच्छित आहे,” असेही पुढे बोलताना कुगंद्री हिने सांगितले.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक :
शुक्रवार, 27 नोव्हेंबर- पहिला टी20, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, केपटाऊन
रविवार, 29 नोव्हेंबर – दुसरा टी 20 , दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, बोलँड पार्क, पर्ल
मंगळवार, 01 डिसेंबर-तिसरा टी 20, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, केपटाऊन
शुक्रवार, 1 डिसेंबर- पहिला वनडे सामना, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, केपटाऊन
रविवार, 6 डिसेंबर- दुसरा वनडे सामना, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, बोलँड पार्क, पर्ल
बुधवार, 9 डिसेंबर- तिसरा वनडे, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, केप टाउन
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक:
26-30 डिसेंबर 2020- पहिली कसोटी, दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
3-7 जानेवारी 2021- दुसरी कसोटी, दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, वँडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
महत्त्वाच्या बातम्या-
-चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! भारत-ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सामन्याचा घेऊ शकतात प्रत्यक्ष आनंद
-ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच टीम इंडियाच टेन्शन वाढलं ; ‘या’ व्यक्तीला झाली कोरोनाची लागण
-आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल
ट्रेंडिंग लेख-
-…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
-चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे
-अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…