राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२२चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगलेल्या या महत्वपूर्ण सामन्यासाठी १ लाखापेक्षा जास्त दर्शकांनी स्टेडियममध्ये उपस्थिती लावली होती. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीपासून ते बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगपर्यंत बरीच दिग्गज मंडळीही हा सामना पाहायला आली होती. या सामन्यापूर्वी समारोप समारंभ झाला, ज्यामध्ये भारतीयांच्या अंगावर काटा आणणारा क्षण पाहायला मिळाला.
अंतिम सामना (IPL 2022 Final) सुरू होण्याच्या दीड तास आधी अर्थात ६.३० वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) समारोप समारंभ झाला. या समारंभात स्टार हिंदी गायक एआर रेहमान (AR Rehman), मोहित चौहान, निती मोहन हेदेखील उपस्थित होते. या तिघांनी मिळून समारोप समारंभाला चार चांद लावले.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या नेत्रदिपक नृत्य प्रदर्शनानंतर रेहमान, मोहित आणि नितीने मिळून वंदे मातरम (Vande Mataram) हे गीत गायले. यावेळी त्यांच्यासोबत अहमदाबादच्या स्टेडियममध्ये उपस्थित प्रत्येक दर्शक हे गीत गाताना दिसला. आपल्या जागेवरून उभे राहात सर्वांनी अगदी मनापासून हे देशभक्तीपर गीत गायले. १ लाखांपेक्षा अधिक लोकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये एकाच वेळी वंदे मातरम असा आवाज घुमत असतानाचा सुंदर क्षण कॅमेरात कैद झाला असून आयपीएलने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर याचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या वेगाने व्हायरल होत आहे.
Vande Mataram 🇮🇳 @arrahman's magical performance will touch your hearts. #TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/ixvjn9vlRT
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
दरम्यान हा समारोप समारंभ जवळपास ४५ मिनिटे चालू शकतो. याआधी २०१८च्या आयपीएल हंगामाचा समारोप समारंभ झाला होता. २०१९मध्ये पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिकांसाठी हा समारंभ टाळला होता. तर २०१९ नंतर कोरोनामुळे तो करता आला नव्हता. मात्र २०२२ मध्ये पुन्हा एकदा बीसीसीआय या समारंभाचे आयोजन करण्यात यशस्वी ठरली आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘वॉर्न या जगात नसल्याने मन उदास आहे’, आयपीएलपूर्वी बटलरने कर्णधार सॅमसनपुढे मांडल्या भावना