आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्जने सात खेळाडूंना खरेदी केले. या सात खेळाडूंना संघासोबत जोडल्यानंतर आता त्यांचा ताफा पूर्ण झाला आहे. शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीमध्ये बीसीसीआयने हा लिलाव आयोजित केला. काही भारतीय खेळाडूंसह विदेशी खेळाडूंवर याठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च केले गेले. सीएसके फ्रँचायझीने मनसोक्त खर्च करत स्वतःच्या गरजेप्रमाणे संघ तयार केला. सीएसकेने सर्वात जास्त रक्कन बेन स्टोक्सवर खर्च केली. तर अजिंक्य रहाणेसारखा अनुभवी फलंदाज त्यांना स्वस्तात मिळाला.
बेन सोक्स (Ben Stokes) मागच्या आयपीएल हंगामात खेळला नव्हता. त्यावेळी तो आयपीएलसोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देकील बाहेर होता. पण नंतर स्टोक्सने संघात जोरदार पुनरागमन केले आणि आगामी आयपीएल हंगामात देखील खेळणार आहे. स्टोक्सला संघात घेण्यासाठी सीएसके फ्रँचायझीने 16.50 कोटी रुपयांची बोली लावली आणि त्याला खरेदी देखील केले. आता एवढी मोठी बोली लावल्यानंतर फ्रँचायझीने त्याच्याकडून अपेक्षा देखील त्याच पातळीच्या असतील. त्याचे आगामी आयपीएल हंगामातील प्रदर्शन पाहण्यासारखे असेल. त्याव्यतिर्कत सीएसकेने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सारखा दिग्गज अवघ्या 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केला आहे. कायले जेमिन्सनसाठी फ्रँचायझीने 60 लाख रुपये खर्च केले. सीएसकेने या लिलावात एकूण 7 खेळाडूंवर बोली लावली.
लिलावात सीएसकेने खरेदी केलेले खेळाडू –
बेन स्टोक्स- 16.25 कोटी
काइले जेमिंसन- 01 कोटी
निशांत सिंधू- 60 लाख
अजिंक्य रहाणे- 50 लाख
शेख रशीद- 20 लाख
अजय मंडल-20 लाख
भगत वर्मा- 20 लाख
सीएसकेकडे शिल्लक असलेली रक्कम – 1.50 कोटी
आयपीएल 2023 साठी सीएसकेचा संपूर्ण संघ –
एमएस धोनी (कर्णधार), डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोइन अली, शिवम दुबे, राजवर्धन हैंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रवींद्र जडेजा, काइले जेमिंसन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा, अजय मंडल. (CSK has bought a total of seven players including Ben Stokes and Ajinkya Rahane in the IPL auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वविजेत्या इंग्लिश खेळाडूंची आयपीएल लिलावात चांगलीच चांदी! सारेच बनले कोट्याधीश, एकही नाही लाखात
काव्या मारन पुन्हा व्हायरल, हॅरी ब्रूकला खरेदी केल्यानंतर दिली मस्त स्माईल