आयपीएल 2023 साठी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेलाडूंची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करण्यासाठी आयपीएलकडून मंगळवारपर्यंतचा वेळ दिला गेला होता आणि सर्व संघांनी त्यांची यादी जाहीर देखील केली आहे. वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू ड्वेन ब्रावो मागच्या मोठ्या काळापासून चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करत आला आहे. आय़पीएल पुढच्या हंगामासाठी मात्र त्याला सीएसकेने संघातून वगळले आहे. सीएसकेच्या चाहत्यांसाठी हा मोठा थक्का मानला जात आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चार वेळा आयपीएल विजेता बनला आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी देखील सीएसके संघात जास्त काही बदल झाल्याचे दिसले नाहीये. आयपीएलच्या मीनी लिलिवापूर्वी संघाने मंगळवारी त्यांच्या रिटेल केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) संघाची साथ सोडणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी समोर आल्या होत्या, पण त्याला संघासोबत ठेवले गेले आहे. परंतु त्यांचा अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) मात्र आगामी हंगामात संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार नाहीये.
ब्रावोप्रमाणेच भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) यालाही सीएसकेने संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ब्रावोने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 161 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 1560 धावा केल्या आहेत. गोलंदाजाच्या रूपात ब्रावोने आयपीएलमध्ये त्याने तब्बल 183 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची आयपीएल कारकिर्दी मोठी राहिली असली, तरीही आता चाहते त्याला या लीगमध्ये पुन्हा खेळताना पाहू शकतील याची शक्यता खूपच कमी आहे.
सीएसकेने रिटेन केलेले खेळाडू –
एमएस धोनी (कर्णधार), डिवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापती, मोइन अली, शिवम दूबे, राजवर्धन हैंगरगेकर, ड्वाइन प्रीटोरियस, मिशेल सेंटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमर देशपांडे, दीपक चाहर, प्रशांत सोलंकी, महेश तीक्षणा.
सीएसकेने रिलिज केलेले खेळाडू –
ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा, एडम मिलने, हरि निशांत, क्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीशन. (CSK has not retained Dwayne Bravo for IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टेनिस कोर्टवरही धोनीचाच जलवा! नामांकित स्पर्धेत घातली थेट विजेतेपदाला गवसणी
आशिया चषकापासून रोहितकडे पाहतोय पाकिस्तानी दिग्गज; म्हणाला, ‘विराटने संघात बदल केला, पण…