आयपीएल मधील एक सर्वाधिक यशस्वी आणि लोकप्रिय संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. चेन्नईच्या संघाने आत्तापर्यंत तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र चेन्नईने विजेतेपद पटकावले अथवा नाही, तरी त्यांच्या लोकप्रियतेला कधीच धक्का लागत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा कर्णधार एमएस धोनी.
धोनी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील एक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. त्याच्या मैदानातील खेळावर तर चाहते प्रेम करतातच. मात्र मैदानाबाहेरील त्याच्या फोटो आणि व्हिडिओंवर देखील चाहत्यांचे बारकाईने लक्ष असते. याचेच नुकतेच पुन्हा एकदा प्रत्यंतर आले.
चेन्नईने शेअर केला जुना फोटो
नुकतच चेन्नई सुपर किंग्जने आपल्या काही खेळाडूंचे तरुणपणीचे फोटो शेअर केले. यात एमएस धोनी, सॅम कुरन, नारायण जगदीशन या खेळाडूंचा समावेश होता. ‘तरुणाईचे फॅशन आयकॉन’, असे कॅप्शन देखील त्यांनी या ट्विटला दिले आहे.
Did we hear 𝑭𝒂𝒔𝒉𝒊𝒐𝒏 𝒊𝒄𝒐𝒏 𝒊𝒏 𝒚𝒐𝒖𝒕𝒉? 😎#Whistlepodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/uii0VnFbXY
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) June 7, 2021
यावर चेन्नईच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. काही चाहत्यांनी धोनी अजूनही तरुणाईचा फॅशन आयकॉन असल्याचे म्हंटले आहे. तर काहींनी धोनी सुरुवातीपासून आपल्या लूक्सने घायाळ करत असल्याचे म्हंटले आहे. तर काही चाहत्यांनी धोनीचे तरुणपणीचे इतर फोटो देखील शेअर केले आहेत.
https://twitter.com/Mr_unknown23_/status/1401761002425774081
https://twitter.com/aryan_msdian/status/1401750717300314117
— Definitely Not 🤞 (@NiharDhoni) June 7, 2021
https://twitter.com/JesusLovesU97/status/1401750314819014661
धोनी पुन्हा दिसणार मैदानावर
दरम्यान, एमएस धोनी काहीच दिवसात पुन्हा एकदा मैदानावर खेळतांना पाहायला मिळणार आहे. आयपीएल २०२१चा हंगाम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मध्यातच स्थगित करावा लागला होता. आता हा हंगाम येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातीत अर्थात युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या उर्वरित हंगामात धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करतांना दिसेल. एप्रिल-मे महिन्यात या हंगामाचे अर्धे सामने खेळवण्यात आले होते, त्यावेळी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने शानदार कामगिरी केली होती. आता दुसर्या टप्प्यात देखील हाच फॉर्म कायम राखत चेन्नई यंदा आपले चौथे आयपीएल विजेतेपद पटकावेल, अशी चाहत्यांना आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
राशीद खानला करायची आहे सचिन तेंडुलकर विरुद्ध गोलंदाजी; हे आहे कारण
‘क्या गुंडा बनेगा रे तू?’, लॉर्डस कसोटी ड्रॉ करणार्या इंग्लंडची जाफरने उडवली खिल्ली
असे तीन खेळाडू, ज्यांच्याबद्दल म्हटले जाते की त्यांना वडिलांमुळे मिळाले होते टीम इंडियात स्थान