---Advertisement---

टीम इंडियाच्या विजयावर आख्ख्या जगाने दिल्या शुभेच्छा, पण सचिन अन् ‘या’ दिग्गजाच्या पोस्टने वेधले लक्ष

Sachin-Tendulkar
---Advertisement---

जेव्हा कोणताही क्रिकेट संघ विजयी होतो, तेव्हा त्याच्यावर जगभरातून कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतो. मात्र, त्यातील काही मोजक्याच प्रतिक्रिया अशा असतात, जे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. असेच काहीसे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 29व्या सामन्यात भारतीय संघाच्या विजयानंतर पाहायला मिळाले. रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) लखनऊमध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. यासह भारताने स्पर्धेत विजयी ‘षटकार’ मारला. भारताच्या विजयानंतर महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्यासह इतर माजी खेळाडूही सोशल मीडियावर व्यक्त झाले.

भारतीय संघाच्या विजयानंतर सचिनची प्रतिक्रिया
रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केला. भारताने गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध तिन्ही विभागात जबरदस्त प्रदर्शन केले. त्यामुळे रोहितसेनेला सांघिक विजय मिळवण्यात यश आले. आता भारताने 6 पैकी 6 सामने जिंकले आहेत. या विजयानंतर संघावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. त्यात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या पोस्टने लक्ष वेधले आहे.

‘क्रिकेटचा ब्रँड’
सचिनने एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून लिहिले की, “आज भारतीय संघाने खेळलेला ‘क्रिकेटचा ब्रँड’ पसंतीस पडला. त्यांना अशाप्रकारे खेळताना पाहणे आनंदाची बाब होती. खूप छान.” आता सचिनची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.

सचिनव्यतिरिक्त भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यानेही विजयानंतर एक्स (X) अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले की, “जय हो! भारतीय संघासाठी 6 पैकी 6 विजय. यावेळी गतविजेत्याविरुद्ध खास अंदाजात डिफेंड केले. रोहित आणि शमीची शानदार खेळी, एकदम शानदार.”

भारताचा दणदणीत विजय
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे, भारत या स्पर्धेत पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. कारण, यापूर्वीच्या पाचही सामन्यात भारताना आव्हानाचा पाठलाग करताना विजय साकारला होता. अशात या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 9 विकेट्स गमावत 229 इतकी कमी धावसंख्या उभारली होती. यामध्ये रोहित शर्मा याच्या महत्त्वाच्या 87 धावांचाही समावेश होता. तसेच, सूर्यकुमार यादव यानेही 49 धावा केल्या होत्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या नाकी नऊ आल्या. भारतीय गोलंदाजांनी त्यांना घाम फोडला. इंग्लंडचा संपूर्ण डाव अवघ्या 129 धावांवर गडगडला. मोहम्मद शमी याने घातक वेगवान गोलंदाजी करत 7 षटकात 22 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, जसप्रीत बुमराह यानेही 6.5 षटकात 32 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या.

तसेच, कुलदीप यादवनेही शानदार गोलंदाजी केली. त्याने 8 षटकात 24 धावा खर्चून 1 विकेट घेतली. रवींद्र जडेजा याच्या नावावरही 1 विकेटची नोंद झाली. या विजयानंतर भारत पॉईंट्स टेबलमध्ये 12 गुणांसह अव्वलस्थानी पोहोचला. तसेच, गतविजेता इंग्लंड 6 पैकी 5 पराभवांसह 2 गुण मिळवत दहाव्या स्थानी आहे. (cwc 2023 ind vs eng brand of cricket sachin tendulkar react on team india victory over england and this cricketer also see here)

हेही वाचा-
भारताचा भीमपराक्रम! पराभव केला इंग्लंडचा, पण World Record तुटला न्यूझीलंडचा; बनला दुसराच संघ
इंग्लंडकडून ‘100 गुना लगान’ घेत टीम इंडिया अव्वल क्रमांकाच्या सिंहासनावर विराजमान, गतविजेते वाईट स्थितीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---