विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39व्या सामन्यानंतर क्रिकेट जगतात सध्या एका नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. ते नाव इतर कुठले नसून ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याचे आहे. मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने होते. या सामन्यात अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आल्या होत्या. त्यांनी 98 धावांवर 7 विकेट्स गमावल्या होत्या, पण मॅक्सवेलने जेव्हा आपले रूप दाखवले, तेव्हा थेट विश्वचषकात नवीन इतिहास घडवला. त्याने आव्हानाचा पाठलाग करताना द्विशतक ठोकले. अशात मॅक्सवेलच्या या जबरदस्त खेळीवर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत, पण यातील सर्वात खास प्रतिक्रिया विराट कोहलीची ठरली.
मॅक्सवेलची तडाखेबंद खेळी
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) या सामन्यात अफगाणिस्तानच्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. मॅक्सवेल 24 धावांवर खेळत असताना ऑस्ट्रेलियाने 7 बाद 98 धावा केल्या होत्या. मात्र, तिथून पुढे मॅक्सवेलने आपल्या धावांची गती वाढवली. यादरम्यान त्याच्या पायाचे गोळे दुखत होते, पण तरीही तो खचला नाही. त्याने एका जागी उभे राहून फलंदाजी केली. त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने या सामन्यात फक्त 128 चेंडूंचा सामना करत तब्बल 201 धावांची नाबाद द्विशतकी खेळी केली. त्याच्या खेळीत 10 षटकार आणि 21 चौकारांचा समावेश होता. मॅक्सवेलची ही खेळी पाहून विराट कोहली (Virat Kohli) हासुद्धा अवाक् झाला.
विराट कोहली इंस्टा स्टोरी
ग्लेन मॅक्सवेल याची खेळी पाहून विराट कोहली स्वत:ला त्याचे कौतुक करण्यापासून रोखू शकला नाही. विराट कोहली इंस्टा स्टोरी (Virat Kohli Insta Story) शेअर करत म्हणाला, “हे फक्त तूच करू शकतो. विलक्षण. ग्लेन मॅक्सवेल.”
Virat Kohli’s Instagram story for Glenn Maxwell. pic.twitter.com/WlY20Xux12
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 8, 2023
दोघेही संघसहकारी
खरं तर, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल (Virat Kohli And Glenn Maxwell) हे दोघेही इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून खेळतात. कदाचित, त्यामुळेच आपल्या संघसहकाऱ्याची खेळी पाहून विराटला त्याचे कौतुक करण्याचा मोह आवरला नसेल.
विश्वचषकातील कामगिरी
ग्लेन मॅक्सवेल विश्वचषक 2023 (Glenn Maxwell World Cup 2023) स्पर्धेच्या सुरुवातीच्या चार सामन्यात खास प्रदर्शन करू शकला नव्हता. मात्र, त्यानंतर पुढील तिन्ही सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. मॅक्सवेल चांगल्या लयीत आला असून त्याने नेदरलँड्सविरुद्ध शतक आणि आता अफगाणिस्तानविरुद्ध द्विशतक ठोकले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात 79.40च्या सरासरीने 397 धावा केल्या आहेत. (cwc 23 aus vs afg virat kohlis instagram story for glenn maxwell)
हेही वाचा-
तोंडचा घास हिरावताच अफगाणी कर्णधाराची सर्वात मोठी प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाला, ‘मॅक्सवेल थांबलाच नाही…’
विजयानंतर मॅक्सवेलविषयी कर्णधार कमिन्सची मन जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला तर वाटलं होतं…’