सोमवारी (८ ऑगस्ट) कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी पदक जिंकून देशाच्या पदकांची संख्या वाढवण्याचा प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न आहे. यावर्षी खेळल्या गेलेल्या स्पर्धेत अनेक रोमांचक गोष्टी पाहायला मिळाल्या. स्पर्धेत पहिल्यांदाच महिला क्रिकेटला सामील केले गेले होते, ज्याचे सुवर्ण पदक ऑस्ट्रेलियन संघाने जिंकले. ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तिंनी कॉमवेल्थ गेम्समध्ये पदकाची कमाई केली आहे.
मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याचा लहान भाऊ ब्रेंडन स्टार्क (Brandon Starc) याने ऑस्ट्रेलियासाठी उंच उडीमध्ये रौप्य पदक जिंकले. ब्रेंडनने २.२५ मीटर उंच उडी मारून है पदक पटकावले आहे. भारताच्या तेजस्विनी शंकरने या स्पर्धेत २.२२ मीटर उंच उडी मारली आणि कांस्य पदक जिंकले. तत्पूर्वी २०१८ साली ब्रेंडनने गोल्ड कोस्ट गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २०१० साली युथ ऑलिम्पिक स्पर्धेतून झाली होती. तेव्हाही त्याने रौप्य पदक जिंकले होते.
याची पत्नी एलिसा हिली (Alyssa Healy) कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियन संघाने कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच खेळताना ही सुवर्ण पदक जिंकले असले तरी, एलिसा हिलीचे प्रदर्शन मात्र समाधानकारक नव्हते.
कॉमनवेल्थमधील एलिस हिलीच्या प्रदर्शानाचा विचार केला, तर ते अपेक्षित नव्हते. भारताविरुद्ध ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात ती स्वतःचे खातेही खोलू शकली नव्हती. तसेच ग्रुप स्टेजच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्येही शेवटच्या तिने बारबाडोसविरुद्ध २३ तर पाकिस्तानविरुद्ध ४ धावांची खेळी केली. उपांत्य सामन्यातही तिची बॅट शांत दिसली. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात हिलीने १४ धावा केल्या. तर अंतिम सामन्यात पुन्हा एकदा ७ धावांवर समाधान मानावे लागले.
एलिसा हिलीच्या टी-२० कारकिर्दीचा विचार केला, तर या फॉरमॅटमध्ये तिची आकडेवारी चांगली राहिली आहे. तिने १३२ सामन्यांमध्ये २३ च्या सरासरीने २२०७ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १४८ धावा ही तिची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या आधी २०२० साली देखील ऑस्ट्रेलिया आणि भारत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमने सामने आले होते आणि तेव्हाही भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शॉकिंग! शोएब अख्तरची मोठी सर्जरी; हॉस्पिटलच्या बेडवरूनच म्हणतोय, ‘मला फक्त तुमच्या प्रार्थनेची गरज’
जगातील सर्वात महान टेनिसपटू दरवर्षी का देतो बॉलबॉयला पिझ्झा पार्टी? काय आहे नक्की रहस्य?
Breaking: फायनलमध्ये पीव्ही सिंधूचा ‘गोल्डन स्मॅश’! भारताच्या पदरात १९वे सुवर्ण पदक




