दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून २०२१मध्ये निवृत्ती घेतली आहे. यानंतर तो सोशल मीडियावर त्याच्या हेयर स्टाईल्स, साहसी घटना, वेगवेगळ्या प्रकारचे मासे पकडलेले फोटो, स्केटबोर्डवरचे स्टंट इतर बाबींवरून चर्चेत असतो. तसेच त्याचे इंन्टाग्रामचे अकाउंट याच प्रकारच्या फोटोंनी भरले आहेत. नुकतेच त्याने स्केटबोर्डवर केलेला स्टंटही चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या या स्टंटचा व्हिडिओ सनरायजर्स हैद्राबादने त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून शेयर केला असल्याने तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
क्रिकेटच्या कारकिर्दीत डेल स्टेन (Dale Steyn) याने त्याच्या वेगवान गोलंदाजीने सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. त्याच्या जबरदस्त वेगामुळे त्याला क्रिकेटविश्वात ‘स्टेन गन’ असे नावही पडले आहे. मात्र त्याने केलेला तो स्केटबोर्डवरचा स्टंट पाहून तो ३९ वर्षाचा आहे यावर विश्वासच बसत नाही. स्टेन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सनरायजर्स हैद्राबादच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे.
सनरायजर्स हैद्राबादने त्यांच्या सोशल मीडियावर स्टेनच्या स्टंटचा व्हिडिओ शेयर करत त्याला ‘हा स्वॅग कधी कमी होत नाही’, असे कॅप्शन दिले आहे.
The swag never drops 😎🧡@DaleSteyn62 | #OrangeArmy pic.twitter.com/fmfQfypS7k
— SunRisers Hyderabad (@SunRisers) August 11, 2022
स्टेनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
स्टेनने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला २००४ मध्ये सुरूवात केली. त्याने इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण करताना ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने १६ वर्षांच्या कारकिर्दीत ९३ कसोटी सामन्यांत ४३९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कसोटीतील सर्वोत्तम षटक पाकिस्तान विरुद्ध २०१३मध्ये टाकले होते. जोहान्सबर्गच्या त्या सामन्यात स्टेनने पहिल्या डावात ८.१ षटक टाकत ६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्यातील ६ षटके निर्धाव होती. तर दुसऱ्या डावात ५२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
स्टेनने १२५ वनडे सामन्यात १९६ विकेट्स आणि ४७ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ६४ विकेट्स घेतल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्येही पाकिस्तान विरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. त्याने २०१३च्या पोर्ट एलिजाबेथ येथे झालेल्या सामन्यात ९ षटकांत ३९ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या होत्या.
स्टेनची आयपीएल कारकिर्द
स्टेन २००८च्या पहिल्या आयपीएल हंगामांनतर तो अनेक संघाकडून खेळताना दिसला. त्याने आयपीएलच्या ९५ सामन्यांत ६.९२च्या इकॉनॉमी रेटने ९७ विकेट्स घेतल्या आहेत. २०२०मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विकत घेतले होते. त्याने शेवटचा सामना २०२०मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळला आहे. तसेच त्याने शेवटच्या दोन वर्षांमध्ये ५ सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय समजून अभद्र शब्द वापरायचे आपलेच संघ सहकारी, ‘या’ किवी खेळाडूने मांडली व्यथा
‘गेले ६ महिने माझ्यासाठी खूप अवघड होते!’ झिम्बाब्वे विरुद्ध पुनरागमन करणाऱ्या खेळाडूने उलघडले गुपित
आशिया कपमध्ये उतरण्याआधीच टीम इंडियाच्या ‘या’ दोन प्रतिस्पर्ध्यांचे झाले खच्चीकरण