इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात उद्या(5 जून) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सामना होणार आहे. पण या सामन्याआधीच दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्का बसला आहे. त्यांंचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन 2019 विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
तो खांद्याच्या दुखापतीतून सावरला नसल्याने या विश्वचषकातून एकही सामना न खेळता बाहेर पडला आहे. त्याला यावर्षीच्या आयपीएल दरम्यान खांद्याच्या दुखापतीचा त्रास झाला होता. त्यामुळे तो आयपीएलमधून केवळ दोन सामने खेळल्यानंतर मायदेशी परतला होता.
तो विश्वचषकापर्यंत या दुखापतीतून बरा होईल अशी दक्षिण आफ्रिकेला आशा होती. त्यामुळे त्याला विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात कायम करण्यात आले होते. परंतू त्याला खांद्याच्या दुखापतीचा त्रास अजूनही होत आहे.
त्याने या दुखापतीच्या समस्येसाठी 2016 मध्ये शस्त्रक्रिया केली होती. परंतू तरीही त्याचा खांद्याच्या दुखापतीचा त्रास कमी झालेला नाही .
स्टेन ऐवजी या विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात ब्युरन हेन्ड्रिक्सचा समावेश करण्यात आला आहे. हेन्ड्रिक्सने याचवर्षी जानेवारी महिन्यात पाकिस्तान विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच त्याने आत्तापर्यंत केवळ 2 वनडे सामने खेळले असून एक विकेट घेतली आहे. हे दोन्ही सामने त्याने जानेवारीमध्ये खेळले आहेत.
वनडेतील त्याची कामगिरी खास नसली तरी त्याची टी20 मधील कामगिरी चांगली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 10 टी20 सामने खेळताना 18.93 च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या आहेत. तो 140 किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकू शकतो. त्यामुळे आता त्याच्याकडून दक्षिण आफ्रिकेला चांगल्या खेळाची अपेक्षा असेल.
दक्षिण आफ्रिका मागील काही दिवसांपासून खेळाडूंच्या दुखापतींचा मोठ्या प्रमाणात सामना करत आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी हा देखील 8-10 दिवसांसाठी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
त्याला रविवारी बांगलादेश विरुद्ध खेळताना हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला होता. तो 10 जूनला होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यापर्यंत बरा होईल अशी दक्षिण आफ्रिकेला आशा आहे.
तसेच दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज हाशिम अमलाला इंग्लंड विरुद्ध 2019 विश्वचषकातील पहिलाच सामना खेळताना डोक्याला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. त्यामुळे तो बांगलादेश विरुद्ध खेळला नव्हता. पण तो भारताविरुद्ध संघात पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे.
#BreakingNews Dale Steyn out of the ICC Men’s Cricket World Cup, with Beuran Hendricks to replace him. More to follow. #CWC19 pic.twitter.com/vZLZWj6kw4
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 4, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या दिग्गज फुटबॉलपटूने भारताची जर्सी घालून कर्णधार कोहलीला दिल्या विश्वचषकासाठी खास शुभेच्छा
–विश्वचषक २०१९: किंग कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे दोन मोठे पराक्रम करण्याची सुवर्णसंधी
–विश्वचषक २०१९: खेळाडूने नाही तर चक्क फोटोग्राफरने घेतला एका हाताने अफलातून झेल, पहा व्हिडिओ