आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक ऑस्ट्रेलियाचा डॅनियल क्रिस्टियन याने अचानक निवृत्तीची घोषणा केली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये धमाकेदार प्रदर्शन करणारा क्रिस्टियन सद्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स संघासाठी खेळत आहे. 39 वर्षीय क्रिस्टियनने शनिवारी (21 जानेवारी) अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे चाहत्यांसाठी हा मोठा धक्का ठरत आहे. बीबीएलचा चालू हंगाम संपल्यानंतर क्रिस्टियन क्रिकेटमधून निवृत्ती घेईल.
डॅनियल क्रिस्टियन (Daniel Christian) याने सिडनी सिक्सर्स संघासाठी बीसीसीएलच्या चालू हंगामात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. यापूर्वी त्याने आयपीएल 2021 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी क्रिस्टियनच्या गरोदर पत्नीविषयी सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून चुकीच्या कमेंट्स केल्या गेल्या होत्या. क्रिस्टियनची टी-20 कारकीर्द खूपच उत्कृष्ट राहिली आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये 405 सामने खेळले असून यात 5809 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 280 विकेट्स देखील घेतल्या आहेत. क्रिस्टियनने सोशळ मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना त्याच्या निवृत्तीची माहिती दिली.
क्रिस्टियन खेळत असलेल्या सिडनी सिक्सर्स (Sidney Sixeers) संघाने बीबीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघ शेवटच्या चार संघांमध्ये सामील होईल अशी पूर्ण शक्यताही आहे. असात कारकिर्दीचा शेवट किस्टियन बीबीएल ट्रॉफी जिंकून करण्याच्या प्रयत्नात असेल. शनिवारी क्रिस्टियनने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून त्याने लिहिले की, “मी काल सराव करताना माझ्या सहकारी खेळाडूंना सांगितले की, बीबीएलच्या चालू हंगामानंतर तो निवृत्ती घेत आहे. सिडनी सिक्सर्सला आज रात्री सामना खेळायचा आहे. ग्रुप स्टेजमधील हा संघाचा शेवटचा सामना आहे आणि यानंतर अंतिम सामना खेळला जाईल. संघ पुढच्या फेरीत जाईल, अशी अपेक्षा आहे. मी याठिकाणी खूपकाही मिळवले. मी इथून खूपसाऱ्या आठवणी माझ्यासोबत घेऊन जात आहे. लहानपणापासून मी हेच स्वप्न पाहत होतो.”
Some news 😁 pic.twitter.com/5xxxkYNQGt
— Dan Christian (@danchristian54) January 20, 2023
आरसीबीच्या पराभवानंतर क्रिस्टियन आणि त्याच्या पत्नी नेटकऱ्यांकडून झालेले ट्रोल –
आयपीएल 2021 मध्ये आरसीबी संघ प्लेऑफ्समध्ये पोहोचला होता. पण बाद फेरीत त्यांना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभव स्वीकारला. क्रिस्टियनने या सामन्यात एका षटकात 22 धावा खर्च केल्या होत्या. आयसीबीच्या पराभवानंतर नेटकरी क्रिस्टियनला ट्रोल करू लागले आणि त्याच्या पत्नीविषयी देखील चुकीच्या कमेंट्स केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रायपूरमध्ये पहिल्यांदाच खेळला जाणार आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या खेळपट्टी आणि स्टेडियमच्या इतिहासाविषयी
दुसऱ्या वनडेत टीम इंडिया उतरणार मालिका विजयासाठी, पण कधी आणि कुठे पाहू शकता लाईव्ह स्ट्रीमिंग?