मुंबई । पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनेरिया हा स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने 2013 साली त्याच्यावर आजीवन क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती.
दानिश क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास पीसीबीकडे परवानगी मागितली आहे.
39 वर्षीय दानिशने नुकतेच त्याच्यावर घातलेली बंदी काढून टाकण्यात यावी, अशी विनंती पीसीबीला केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांना त्याने एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात लिहले की, “माझ्यावर लावण्यात आलेले निर्बंध काढून टाकावे. मी पुन्हा क्रिकेट खेळून माझी उपजीविका चालवू शकतो.”
“मोहम्मद आमिर आणि सलमान बट सारख्या खेळाडूंवर घालण्यात आलेली बंदी पुन्हा हटविण्यात आली असेल तर माझ्यावर वरील ही बंदी मागे घ्यावी, अशी विनंती तो वारंवार पीसीबीकडे करत आहे.”
दानिशवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने देखील आजीवन क्रिकेट खेळण्यास बंदी घातली आहे. दानिशने याविरोधात अपील केले. पण त्याचे हे अपिल फेटाळून लावण्यात आले. त्यानंतर लगेच पीसीबीने त्याच्यावर बंदी घातली.
2009 साली इंग्लिश काउंटी ससेक्स संघाकडून खेळताना डरहम संघाविरुद्धच्या सामन्यात मार्विन वेस्टफिल्ड सोबत स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळून आला होता.
दानिश कनेरिया पाकिस्तानकडून खेळणारा दुसरा हिंदू खेळाडू आहे. यापूर्वी त्याचा मामा अनिल दलपत हे देखील पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले होते. आपल्या जादूई फिरकी गोलंदाजीने पाकिस्तानकडून खेळताना 61 कसोटी 261 सामन्यात बळी घेतले आहेत.