पंजाब किंग्जविरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने सर्वांचे लक्ष वेधले. अवघी एक धाव कमी पडल्यामुळे ब्रेविसचे अर्धशतक हुकले, पण त्याच्या खेळीच चर्चा खूपच होत आहे. २५ चेंडूमध्ये त्याने ४ चैकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या. यादरम्यान, ब्रेविसने अशी काही कामगिरी केली, ज्यानंतर तो ख्रिस गेलसारख्या दिग्गजासह महत्वाच्या यादीत सहभागी झाला आहे. मुंबई इंडियन्सला या सामन्यानंतर हंगामातील सलग ५वा पराभव मिळाला.
पदार्पणाचा आयपीएल हंगाम असल्यामुळे डेवाल्ड ब्रेविस (Dewald Bravis) याच्या खेळीवर चाहते बारीक लक्ष ठेवून आहेत. पंजाब किंग्जविरुद्धच्या या सामन्यात त्याने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. त्याने केलेल्या ४९ धावांमध्ये त्याच्या सलग चार षटकारांचा देखील समावेश होता. यानंतर तो आयपीएल इतिहासातील तिसरा विदेशी खेळाडू बनला आहे, ज्याने एखाद्या आयपीएल सामन्यात लागोपाठ ४ षटकार मारले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आयपीएलच्या इतिहासाताल वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल असा खेळाडू आहे, ज्याच्या नावावर अनेक अबाधित विक्रम आहेत. गेलने आयपीएलमध्ये ३ वेळा सलग चार षटकार मारण्याची कामगिरी केली होती. यादीत दुसरा विदेशी खेळाडू आहे, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर. आर्चरने आयपीएलमध्ये सलग चार षटकार मारण्याची कामगिरी एकदा आहे. या यादीत ब्रेविस नव्याने सहभागी झाला आहे. ब्रेविसने पंजाब किंग्जविरुद्धच्या या सामन्यात फिरकी गोलंदाज राहुल चाहरला सलग चार षटकार मारले आणि सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधले.
The Dewald Brevis show comes to an end here in Pune as he falls for 49.
What a knock that was from the youngster 👏👏
Live – https://t.co/QpRklNl6wU #MIvPBKS #TATAIPL pic.twitter.com/cP6nZlCC4X
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
पंजाब किंग्जचा फिरकी गोलंदाज राहुल चाहर (Rahul Chahar) संघासाठी खूपच महागात पडला. राहुलने टाकलेल्या ९व्या षटकात दक्षिण अफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने एक चौकार आणि नंतर सलग चार षटकार ठोकले. या षटकात मुंबई इंडियन्सच्या धावफलकावर २९ धावा जोडल्या गेल्या. राहुल चाहरने सामन्यात टाकलेल्या ४ षटकात ४४ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही.
सामन्याचा विचार केला, तर पंजाबने १२ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ५ विकेट्सच्या १९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स ९ विकेट्सच्या नुकसानावर १८६ धावा करू शकला. मुंबई इंडियन्सचा प्रत्येक फलंदाज चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नता दिसला, पण संघाला विजय मिळू शकला नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
MI vs PKBS | रंगतदार सामन्यात अखेरच्या षटकात पंजाब विजयी, मुंबईचा सलग ५वा पराभव
मुंबईविरुद्ध ७० धावांची सलामी देणारा ‘गब्बर’ ठरला ‘या’ मोठ्या विक्रमाचा मानकरी, रैनालाही पछाडले