ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर नागपूर कसोटी सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. वॉर्नरप्रमाणेच ऑस्ट्रेलियन संघातील सर्व फलंदाज स्वस्तात गुंडाळले गेले. पण संघ व्यवस्थापन दुसऱ्या कसोटी सामन्यातून वॉर्नरला वगण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 मार्च पासून दिल्लीमध्ये खेळला जाईल. तत्पूर्वी वॉर्नरविषयी ही महत्वाची महिती समोर आली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना नागपूरमध्ये खेळला गेला. 9 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या सामन्याचा निकाल अवघ्या तीन दिवसांमध्ये लागला. सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) आणि त्याचे सहकारी फलंदाज नागपूर कसोटी अपयशी ठरल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ एक डाव आणि 132 धावांनी पराभूत झाला. नागपूर कसोटीत वॉर्नरने अवघ्या 11 धावांचे योगदान दिले असून संघाला तो चांगलाच महागात पडला आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मालिकेत पुनरागमन करणे आता सोपे नसेल. पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या कसोटीसाठी संघात काही महत्वाचे बदल करू शकतो. दिल्लीमध्ये ऑस्ट्रेलियन संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. यात क्वींसलँडचा डावखुरा फिरकी गोलंदाज मॅट कुहनेमन त्याचा पहिला कसोटी सामना खेळू शकतो. ऑस्ट्रेलियाचा राखीव लेग स्पिनर मिचेल स्वेप्सन वडील बनल्यामुळे मायदेशात परतला आहे. अशात स्वेप्सनच्या जागी कुहनेमन याला संघात सामील केले जाऊ शकते. ऑस्ट्रेलियन मीडियामधील वृत्तांनुसार डेविड वॉर्नर नागपूर कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरला. अशात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगण्याचा विचार सुरू आहे. वॉर्नरने मागच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी फक्त 21 धावांचे योगदान दिले आहे.
दरम्यान, नागपूर कसोटीचा एकंदरीत विचार केला, तर ऑस्ट्रेलियने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात रविंद्र जडेजाने भारतासाटी पाच विकेट्सचा हॉल घेत पाहुण्या संघाला 177 धावांवर गुंडाळले. त्यानंतर प्रत्युत्तरात भारताने 400 धावा साकारल्या आणि 223 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ अवघ्या 91 धावांवर सर्वबाद झाला. परिणाम भारताने एक डाव आणि 132 धावांच्या अंतराने विजय मिळवला. (David Warner is expected to be left out of the playing eleven for the Delhi Test match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्नाटकच्याच दिग्गजाने काढले राहुलचे वाभाडे, म्हणाला, “तू 8 वर्षांत काय केलं?”
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताला मोठा झटका, स्म्रिती मंधानाला गंभीर दुखापत