---Advertisement---

भारतात टीक टॉक ऍपवर बंदी घातल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने दिली ही प्रतिक्रिया

On: रविवार, जुलै 5, 2020 2:19 PM
---Advertisement---

मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट सामने होत नसल्यामुळे खेळाडूंनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने टाळेबंदीच्या काळात टीक टॉकवर अनेक व्हिडिओ बनवले होते. त्याची पत्नी आणि मुली यांच्यासोबत भारतीय गाण्यांवर त्याने बनवलेले टीक टॉक व्हिडिओ भारतात खूपच लोकप्रिय झाले होते.

नुकतेच भारत सरकारने टीक टॉकसह 59 चिनी ऍपवर बंदी घातली आहे. या निर्णयावर डेव्हिड वॉर्नरने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. वॉर्नर म्हणाला की,” भारतात चिनी ऍपवर बंदी घातली आहे. हा सरकारचा निर्णय आहे. भारतीय लोकांनी या निर्णयाचे स्वागत आणि आदर केला पाहिजे.”

डेव्हिड वॉर्नरचे टीक टॅक व्हिडिओ भारतात खूपच प्रसिद्ध झाले होते. शिल्पा शेट्टी, महेश बाबू सहित अनेक स्टार त्याचे फॅन झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला की,”यावेळेस वॉर्नर व्यस्त आहे. डान्स करणे आणि इकडे तिकडे फिरण्यात बिझी आहे. त्याने भारतात एक वेगळे वातावरण तयार केले आहे.

सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक (मेंटर) व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की,“एक गोष्ट नक्की आहे की सनराइज हैदराबादचे चाहते त्याच्यावर खूपच खूश आहेत. वॉर्नरला भारतीय संघात निवडले जाणार नाही. मात्र, टॉलिवूडच्या चित्रपटात त्याला अभिनयाची संधी जरूर मिळेल यात कोणतीच शंका नाही.”

मागील काही दिवसात वॉर्नरने महेश बाबू यांच्या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ बनवला होता. तसेच बाहुबली चित्रपटातला एक सीन देखील रीक्रिएट केला होता.

ट्रेंडिंग घडामोडी – 

‘हा’ माजी कर्णधार ड्रेसिंगरुममध्ये आला की सगळे खेळाडू जायचे पळून

गंभीर गुन्ह्याखाली श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुसल मेंडिसला अटक

गुरु पौर्णिमा- आजपर्यंत टीम इंडियाला लाभलेले गुरु, ज्यांनी घडवला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---