आयपीएल २०२१ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तसेच सतत पराभव होत असल्याने त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याचे संकट ओढवले जाऊ शकते. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने टोकाची भूमिका घेत डेविड वॉर्नरला कर्णधार पदावरून काढून टाकले. इतकेच नव्हे तर, रविवारी (२ मे) राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात डेविड वॉर्नरला प्लेइंग ११ मध्ये देखील संधी मिळाली नव्हती. यामुळे डेविड वॉर्नरच्या भावाने संताप व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला ५५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्याचे नेतृत्व केन विलियम्सनने केले होते. तसेच डेविड वॉर्नर ‘वॉटर बॉयची’ भूमिका पार पाडताना दिसून आला होता. यावर संताप व्यक्त करत डेविड वॉर्नरचा भाऊ स्टीव वॉर्नरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत फ्रॅंचाईजीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
त्याने आपल्या पोस्टमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला टॅग करत डेविड वॉर्नरची २०१४ पासून ते आतापर्यंतची आकडेवारी शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये या गोष्टीवर जास्त भर दिला आहे की, संघात सलामी फलंदाज चिंतेचा विषय नाहीये. युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत देखील सनरायझर्स हैदराबाद संघातील मधल्या फळीतील फलंदाज चिंतेचा विषय होते आणि आताही तसेच काहीतरी दिसून येत आहे. त्याच्या मते मधल्या फळीतील फलंदाजांना धावा करण्याची आवश्यकता आहे.
सनरायझर्स हैदराबादला मध्यक्रमात चांगल्या फलंदाजांना संधी देण्याची गरज
स्टीव वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादला सल्ला देत म्हटले की, “एका खेळाडूने इतके वर्ष संघाला सांभाळून घेतले. सलामी फलंदाजी तुमच्या संघाची समस्या नाहीये. किती बरे होईल जर तुम्ही अशी मधली फळी तयार कराल, जी तुमच्या संघासाठी धावा करेल.”
डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने, या हंगामात ६ सामने खेळले होते. यात त्यांना एकाच सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर एक सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला होता. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने बाजी मारली होती. तसेच नवा केन विलियम्सनला देखील राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ५५ धावांची पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुझे हाल बघवेना’, संघनायकाचा बनला वॉटरबॉय; डेविड वॉर्नरची अवस्था बघून चाहते हळहळले
“नक्कीच सनरायझर्समध्ये कसली तरी डाळ शिजतेय,” वॉर्नरला संघाबाहेर केल्याने दिग्गजाचे मोठे वक्तव्य
‘नटराज मनिष’, एक पाय वर करत पांडेने खेळला आगळा वेगळा शॉट; आल्या भन्नाट प्रतिक्रिया