मंगळवारी (३जुलै) भारत-इंग्लंड यांच्यात मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लडवर ८ गडी राखून विजय मिळवला.
भारताच्या या विजयात केएल राहुलने शतक तर कुलदीप यादवने पाच बळी मिळवत विजयाचे शिल्पकार ठरले.
मात्र इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हीड विलीने भारतीय गोलंदाज कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार यांच्या गोलंदाजी करताना शेवटच्या क्षणी चेंडू न टाकण्याच्या कृत्यावर जोरदार आक्षेप नोदंवला आहे.
या सामन्यात इंग्लंडच्या डावाच्या १० व्या षटकात कुलदीपने गोलंदाजी करताना रन अप घेऊन शेवटच्या क्षणी दोनदा चेंडू न टाकण्याता प्रकार घडला.
यावेळी स्ट्राइकवर असलेल्या बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी पंचाकडे याची तक्रार केली होती.
तसेच इंग्लडच्या डावातील २० व्या षटाकातील शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने देखील रन अप घेऊन शेवटच्या क्षणी चेंडू टाकला नाही.
तसेच यावरून शेवटच्या षटकात भुवनेश्वर आणि विली यांच्यामध्ये बाचाबाची झाली.
“मला माहीत नाही भारतीय गोलंदाजांची ही कृती क्रिकेटच्या कोणत्या नियमात बसते. त्यांच्या या कृतीला क्रिकेटच्या स्पिरीटमध्ये कुठेही स्थान नाही. त्यांनी काय करावे काय नाही हे सांगने माझे काम नाही. मात्र एक क्रिकेटर म्हणुन मी हे कधीच केले नसते.” डेव्हीड विली या विषयावर आपले मत व्यक्त करताना म्हणाला.
डेव्हीड विलिच्या या आरोपाला भारताचा फलंदाज केएल राहुलने जोरदार प्रत्युत्तर दिले.
“डेव्हीड विलीच्या जागी मी असतो तर मलाही फलंदाज म्हणुन ही कृती आवडली नसती. पण टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांना बचावासाठी अशा काही क्लुप्त्या वापराव्या लागतात.” असे म्हणत केएल राहुलने भुवनेश्वर आणि कुलदीपचे समर्थन केले.
“मला असे वाटते की कुलदीपने हे केल्या त्यात मी त्याला दोषी मानत नाही. कारण बटलर आणि हेल्स क्रिजमध्ये खूपत हालचाल करत होते त्यामुळे त्याच्या बचावासाठी त्याने चेंडू टाकला नसेल”. राहुल विलीच्या आरोपांना उत्तर देताना म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-