पुणे। फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी तर्फे आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरी डेक्कन ऍव्हेंजर्स, टेनिसनट्स फेडल, एफसी बिटल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत क गटात अभिजीत मराठे, आनंद कोटस्थाने, केतन जाठर, गोपीनाथ जयभाई, अनिरुद्ध भल्ला यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन ऍव्हेंजर्स संघाने मॉंट व्हर्ट प्रीस्टाईन 2 संघाचा 23-14 असा पराभव करून बाद फेरीत धडक मारली. ब गटात टेनिस नट्स फेडल संघाने डेक्कन आरएफ संघाचा 24-06 असा सहज पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून रवी कोठारी, माधव भट, दिपक पाटील, सी कुमार, वेंकटेश आचार्य, अजिंक्य पाटणकर, रवी कोठारी, नितीन सावंत यांनी सुरेख कामगिरी केली. अ गटात एफसी बिटल्स संघाने ओडीएमटी 2 संघावर 24-09 असा विजय मिळवत बाद फेरी गाठली.
स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, टायगर्स, एफसी जीएनआर, डेक्कन ग्लॅडिएटर्स, महाराष्ट्र मंडळ, लायन्स, ओडीएमटी 1 या संघांनी बाद फेरीत प्रवेश केला.
निकाल: साखळी फेरी:
डेक्कन ऍव्हेंजर्स वि.वि.मॉंट व्हर्ट प्रीस्टाईन 2 23-14(100अधिक गट: अभिजीत मराठे/आनंद कोटस्थाने वि.वि.जॉर्ज वरघसे/रमेश सुधाकर 6-2; 90अधिक गट: शिवाजी यादव/संतोष जयभाई पराभूत वि.मनिष टिपणीस/सचिन माधव 5-6(5-7); खुला गट: केतन जाठर/अभिजीत मराठे वि.वि.सतीश ओरसे/सोमनाथ पवार 6-1; खुला गट: गोपीनाथ जयभाई/अनिरुद्ध भल्ला वि.वि.रवी जौकनी/रवी मित्तल 6-5(7-4));
टेनिस नट्स फेडल वि.वि.डेक्कन आरएफ 24-06(100अधिक गट: रवी कोठारी/ माधव भट वि.वि.आशिष धोंगडे/दिलीप धामणकर 6-2; 90अधिक गट: दिपक पाटील/सी कुमार वि.वि.श्रीनिवास रामदुर्ग/संदीप माहेश्वरी 6-1; खुला गट: वेंकटेश आचार्य/अजिंक्य पाटणकर वि.वि.समीर सावळा/राहुल मंत्री 6-2; खुला गट: रवी कोठारी/नितीन सावंत वि.वि.अमलेश आठवले/आशिष धोंगडे 6-1);
एफसी बिटल्स वि.वि.ओडीएमटी 2 24-09(100अधिक गट: सुनील लोणकर/शैलेश पटवर्धन वि.वि.श्रीधर जे/कार्तिक श्रीधर 6-4; 90 अधिक गट: अशोक अगरवाल/रोहित शेवाळे वि.वि.पंकज खरे/शैलजा कुमार 6-3; खुला गट: अजिंक्य फडतरे/श्रेयस गजेंद्रगडकर वि.वि.राहुल पाटील/अमित बगाडे 6-1; खुला गट: सचिन साळुंखे/दिविजा गोडसे वि.वि.डीके कर्षन/कार्तिक श्रीधर 6-1).
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी प्रत्येक सामना खेळू इच्छितो, पण आमच्याकडे पंत…’, इशानचे रिषभबरोबरील स्पर्धेबाबत मोठे भाष्य
जेव्हा साहाने कसोटीत न मिळणाऱ्या संधींचा दोष दिला होता धोनीला; म्हणाला होता, ‘मला फक्त कव्हर…’
वॉटसनने सांगितला धोनी-विराटच्या नेतृत्त्वातील फरक, एकाला म्हणाला सुपर ह्युमन; रोहितबद्दलही भाष्य