आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. हा सामना १८ जून ते २२ जून मध्ये होणार आहे. हा सामना साउथम्प्टन येथील रोस बाउल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी अनेक क्रिकेट चाहते उत्सुक आहे. या सामन्याबद्दल अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरनेही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक चाहरने सांगितले हा खेळाडू ठरेल प्रभावी
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे व अंतिम सामन्यासाठी चांगला सराव देखील करत आहे. दीपक चाहरला विचारले गेले होते की कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोण जास्त प्रभावी ठरेल. त्यावर तर त्याने हे सांगितले की “एकदा जसप्रीत बुमराहने आपला लय पकडली की मग न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातच काय तर तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही सर्वाधिक विकेट घेणारा म्हणून पुढे येईल.”
भारताला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
मायकल वॉननेही सांगितले बुमराह बनू शकतो ट्रम्प कार्ड
काही दिवसांपूर्वी इंग्लंडचे पूर्व कर्णधार मायकल वॉनने भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेबद्दल भाष्य करताना सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहचे नाव घेतले होते. हे बघण मनोरंजक असेल की भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंग्लंडमध्ये कसे प्रदर्शन करतो. साल २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये झालेल्या मालिकेत जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते व त्याची एक नवीन ओळख त्याने तयार केली होती. या वेळेसही इंग्लंडच्या खेळपट्ट्या या जसप्रीत बुमराहसाठी फायदेशीर ठरु शकतात.
बुमराहचे कसोटीमधील उत्कृष्ट प्रदर्शन
जसप्रीत बुमराहला सध्या जगातील सर्वात श्रेष्ठ गोलंदाजांमध्ये एक मानले जाते. त्याने आतापर्यंत भारतासाठी १८ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २२.११ च्या उत्तम सरासरीने ८३ विकेट घेतल्या आहे. विदेशी खेळपट्ट्यांवर तो प्रभावशाली दिसून येतो व चांगली कामगिरी करतो.
जसप्रीत बुमराहचा एकदिवसीय आणि टी२० रेकॉर्ड देखील खूप चांगला आहे. त्याने ६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४.६५ च्या इकॉनॉमी रेटने १०८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत त्याने ६.६६ च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने एकूण ५९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
ब्रॉडने षटकार मारत दाखवला धाक, दुसऱ्याच चेंडूवर बोल्ड करत गोलंदाजाने दिले चोख प्रत्युत्तर
शानदार कारकिर्द अन् क्रिकेटची उत्तम जाण असूनही गावसकर प्रशिक्षकपदापासून दूर? वाचा कारण