भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघावर ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्याचा नायक ठरला तो, वेगवान गोलंदाज दीपक चाहर. भारतीय संघ अडचणीत असताना दीपक चाहरने ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद ६९ धावांची खेळी केली आणि भारतीय संघाल विजय मिळवून दिला. हा सामना झाल्यानंतर त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.
दीपक चाहरने भारताकडून गोलंदाजी करताना २ गडी बाद केले होते. त्यानंतर २७६ धावांचा पाठलाग करत असलेल्या भारतीय संघाने १९३ धावांवर ७ गडी गमावले होते. अशावेळी भारतीय संघ अडचणीत असताना दीपक चाहरने भुवनेश्वर कुमारसोबत मिळून ८४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने ३ गडी राखून सामना जिंकला. या दरम्यान दीपक चाहरने नाबाद ६९ धावांची खेळी केली तर, भुवनेश्वर कुमारने नाबाद १९ धावांची खेळी केली होती.
सामना झाल्यानंतर दीपक चाहरने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर विजयी चौकार मारल्याचा व्हिडिओ आणि विजय मिळवल्यानंतर संघ सहकारी त्याच्याकडे धाव घेत असतानाचा फोटो शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये “आम्ही हे क्षण अनुभवण्यासाठी खेळत असतो” असे लिहिले आहे.
तसेच त्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर कॅप्शन दिले की “आम्ही हे क्षण कधीच विसरू शकत नाही. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार.”
Will never forget this moment #teamindia #dream . Thank you so much for your wishes means a lot ☺️???? #keepsupporting pic.twitter.com/y0iGLAaaKY
— Deepak chahar ???????? (@deepak_chahar9) July 21, 2021
सामना झाल्यानंतर दीपक चाहर म्हणाला की “देशासाठी सामना जिंकून देण्यापेक्षा चांगले काही असू शकत नाही. राहुल सरांनी मला प्रत्येक चेंडू खेळण्यास सांगितले होते. भारत अ संघाकडून खेळताना मी काही डावात फलंदाजी केली होती. मला वाटते की, त्यांना माझ्यावर विश्वास आहे. त्यांनी मला सांगितले होते की, तू ७ व्या क्रमांकांवर फलंदाजी करण्यासाठी योग्य आहेस. मी अशी आशा व्यक्त करतो की येणाऱ्या सामन्यांमध्ये मला फलंदाजी करण्याची गरज पडणार नाही. जेव्हा आव्हान ५० धावा दूर होते, तेव्हा मला वाटले की आम्ही हा सामना जिंकू शकतो. त्यापूर्वी मला प्रत्येक चेंडू खेळायचा होता. त्यानंतर मी जोखीम घ्यायला सुरुवात केली होती.”
या वनडे मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारी (२३ जुलै) रोजी खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! हाँगकाँग क्रिकेट संघाच्या कर्णधाराला पोलिसांनी केली अटक, ‘हे’ आहेत आरोप