प्रो कबड्डीचा थरार येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी तीन दिवसीय खेळाडूंच्या लिलावाला प्रारंभ झाला आहे. लिलावातील पहिल्या दिवशी (२९ ऑगस्ट) अवघ्या चार खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी (३० ऑगस्ट) अनुभवी खेळाडूंवर लाखो रुपयांची बोली लावण्यात आली आहे.
प्रो कबड्डीचे ८ वे हंगाम येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सर्व संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू आणि प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपुर पिंक पँथर्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा दीपक निवास हुड्डा यावेळी देखील जयपूर पिंक पँथर्स संघासाठी खेळताना दिसून येणार आहे. जयपूर पिंक पँथर्स संघाने दीपक हुड्डाला एफबीएम कार्डचा वापर करत ५५ लाखांच्या किंमतीत आपल्या संघात पुन्हा स्थान दिले आहे. (Deepak hooda sold to Jaipur pink Panthers)
दीपक हुड्डा सारख्या अनुभवी खेळाडूवर कमी बोली लावण्यात आल्यामुळे चाहते निराश झाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या पहिल्या हंगामात दीपक हुड्डा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला १२.६० लाखांची बोली लावत तेलुगू टायटन्स संघाने आपल्या संघात स्थान दिले होते.
पहिल्या दोन हंगामात तेलुगू टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, तिसऱ्या आणि चौथ्या हंगामात पुणेरी पलटण संघाने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले होते. तसेच गेल्या २ हंगामापासून तो जयपूर पिंक पँथर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. आगामी हंगामात देखील तो याच संघात कायम राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बंगालचा वाघ आता खेळणार पायरेट्स संघासाठी, जँग कुन लीवर लागली ‘इतक्या’ लाखांची बोली