इंडियन प्रीमियर लीग २०२०चा ‘यंगिस्तान’ म्हणून ओळखला जाणारा दिल्ली कॅपिटल्स संघ यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांपैकी ७ सामन्यांत वियजाची पताका झळकावत दिल्लीने गुणतक्यात दूसरे स्थान पटकावले आहे. त्यांच्या या यशामध्ये संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, सलामीवीर शिखर धवन, गोलंदाज कागिसो रबाडा यांच्यासह अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनेही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. याच अष्टपैलू धुरंधरने काही रोमांचक गोष्टींचा खुलासा केला आहे.
खिशात नेहमी असतो लाकडाचा तुकडा
आयपीएलमध्ये प्रति षटक ६ धावांपेक्षा कमी इकोनॉमी रेटने गोलंदाजी करणारा अक्षर नेहमी खिशात लाकडाचा तुकडा घेऊन फिरत असतो. याविषयी दिल्ली कॅपिटल्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बोलताना तो म्हणाला की, “माझे संघसहकारी विशेष म्हणजे, मोहित शर्मा, हर्षल पटेल हे माझ्या दर्जेदार गोलंदाजीला नजर लावतात. त्यांच्या नजरेपासून वाचण्यासाठी मी नेहमी खिशात लाकडाचा तुकडा घेऊन जात असतो.”
हर्षल पटेलच्या इंग्रजीला वैतागलाय
संघसहकारी तसेच जवळचा मित्र असणाऱ्या हर्षल पटेलविषयी बोलताना अक्षर म्हणाला की, “हर्षल परदेशी खेळाडूंपेक्षाही अवघड इंग्रजी शब्दांचा वापर करत असतो. माझ्यामते जर कधी हर्षलच्या जिवनावर चित्रपट बनला, तर तो बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये बनवावा लागेल.”
https://www.instagram.com/tv/CGrKxtaKjyP/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएल २०२०ची आकडेवारी
अक्षरच्या आयपीएल २०२०मधील आकडेवारी विषयी बोलायचं झाल तर, त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ५.७४ इतका राहिला आहे. तर काही दिवसांपुर्वी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या हंगामातील ३४व्या सामन्यात त्याने कमालीचे फलंदाजी प्रदर्शन केले होते. खालच्या फळीत फलंदाजीला येत त्याने ५ चेंडूत ३ षटकार ठोकत नाबाद २१ धावा केल्या होत्या आणि संघाला विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
भाऊच भावाला नडला! खेळायचा होता मोठा फटका, पण झाला यष्टीचीत
धावा करण्यात मागे पडलेली सीएसके विक्रमांत मात्र आघाडीवर, पाहा काय केलाय विक्रम
ट्रेंडिंग लेख-
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला