इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दिल्ली डायनेमोस विरुद्ध जमशेदपूर असा सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगणार आहे.
दिल्ली डायनेमोस संघाचा मागील सामना नॉर्थ ईस्ट युटीडी संघाबरोबर होता. या सामन्यामध्ये नॉर्थ ईस्ट युटीडी संघाने पहिल्या हाफमध्येच २ गोल केले. दिल्ली संघ हा सामना ०-२ अश्या फरकाने हरला. दिल्ली संघाने एकूण ३ सामने खेळले असून १ सामना जिंकला आहे तर २ सामनेसंघ पराभूत झाला आहे. संघाचे एकूण गुण ३ आहेत.
जमशेदपुर संघाचा मागील सामना एटीके संघाबरोबर होता. या सामन्यामध्ये दोन्ही संघानी जोरदार टक्कर दिली. दोन्ही संघाना शेवटपर्यंत एकमेकांविरुद्ध गोल करता आला नाही व या सामन्याचा शेवट ०-० असा झाला. जमशेदपूर संघाने एकून ३ सामने खेळले असून तिन्ही सामने अनिर्णित राहिले आहेत.
दिल्ली डायनेमोस संघाला विजयासाठी जमशेदपुर संघाला जोरदार टक्कर द्यावी लागणार आहे तर जमशेदपूर आजच्या सामन्यात तरी गोल करणार कि नाही याची उत्सुकता लागली आहे.
हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असून जमेशदपूर ९व्या तर दिल्ली ८व्या स्थानी आहे.