संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेची साखळी फेरी संपली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने गुणतालिकेत 10व्या स्थानी राहून हंगामाचा शेवट केला. हैदराबादला मुंबई इंडियन्स संघाविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. सामन्यात हैदराबादकडून सर्वात खराब गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले होते. संघातील अनेक गोलंदाज अपयशी ठरल्याचे दिसले. यामध्ये वेगवान गोलंदाज उमरान मलिक याचाही समावेश होता. भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने उमरान मलिक याच्या प्रदर्शनाने नाराज दिसला.
उमरान मलिकवर वीरेंद्र सेहवाग संतापला
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 69व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) महागडा ठरला. त्याने 3 षटके गोलंदाजी करताना 13.70च्या इकॉनॉमी रेटने 41 धावा खर्च केल्या. त्याला यावेळी एकही विकेट घेता आली नाही.
या सामन्यानंतर वीरेंद्र सेहवाग उमरान मलिकवर भडकला. त्याने म्हटले की, उमरान डेल स्टेन (Dale Steyn) याच्यासोबत राहूनही त्याच्याकडून काहीच शिकू शकत नाहीये. सेहवागने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “गोलंदाज चांगले नव्हते. कर्णधार त्यांच्याकडून लाँग ऑफ आणि लाँग ऑन ठेवण्यासाठी विचारू शकत होता. गोष्ट एवढीच होती की, तुम्ही धावांचा प्रवाह रोखण्यात पूर्णत: अपयशी ठरलात.”
‘डेल स्टेनसोबत राहूनही शिकत नाहीये उमरान’
पुढे बोलताना सेहवाग म्हणाला की, “जर हा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज असता, तर मी समजू शकत होतो की, तो जास्त फुल गोलंदाजी करू इच्छिणार नाही. मात्र, उमरान मलिक… समस्या ही आहे की, तो आपल्या लेंथमध्ये फेरबदल करत असतो. त्याच्याकडे अजून अनुभव नाहीये. त्याने जरी डेल स्टेनसोबत काम केले असले, तरीही त्याला वास्तवात आपल्या लेंथचा अंदाज नाहीये. स्टेनसोबत इतका दीर्घ काळ काम करून आणि त्याच्या मार्गदर्शनात शिकूनही तो चुका करत आहे, जे त्याने मागील वर्षी केल्या होत्या.”
उमरानची हंगामातील कामगिरी
उमरान मलिक याने या हंगामात 8 सामने खेळले, त्यामध्ये त्याला 5 विकेट घेण्यात यश आले. तसेच, मुंबईविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 200 धावा केल्या होत्या, हे आव्हान मुंबईने 18 षटकात 2 विकेट्स गमावत पार केले होते. (despite working with dale steyn former indian player virender sehwag lashes out at pacer umran malik)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमधील खराब कामगिरीने ‘या’ तिघांसाठी बंद झाली टीम इंडियाची दारे, पुनरागमन अशक्यच
‘लोकांना वाटतंय माझा टी20चा स्तर…’, सतत ट्रोल करणाऱ्यांना विराटने एकदाच दिले उत्तर