रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून सलामी फलंदाजी करणाऱ्या देवदत्त पडीक्कलने आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळताना आपले पहिले आयपीएल शतक झळकावले. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीसोबत मिळून त्याने नाबाद १८१ धावांची भागीदारी केली होती. यासोबतच संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला. त्याने या बेंगलोर संघासाठी खेळताना यापूर्वी ५ अर्धशतक झळकावली आहेत. त्याने शतकी खेळी केल्यानंतर सध्या त्याच्या लाल जर्सीच्या कनेक्शन बाबत बरीच चर्चा होत आहे.
त्याचा लाल रंगाचे टी शर्ट परिधान केलेला बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यातच बेंगलोर संघाची जर्सी देखील मुख्यत: लाल रंगाची आहे.
पडीक्कलने आयपीएल २०२० स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून पदार्पण केले होते. या हंगामात त्याने १५ सामन्यात ४७३ धावा केल्या होत्या. यात ५ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच आयपीएल २०२१ च्या हंगामात देखील त्याने जोरदार सुरुवात केली आहे. अशातच त्याचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने लाल रंगाचे टी शर्ट परिधान केलेले दिसून येत आहे. यासोबतच त्याच्या हातात बॅट देखील दिसून येत आहे.
तसेच त्याने कर्नाटक प्रीमियर लीगमध्येही बेलरी टस्कर्स संघाकडून खेळताना लाल जर्सीमध्येच तुफान फटकेबाजी केली होती. त्यामुळे चाहते आता असा अंदाज घेऊ लागले आहेत की, देवदत्त पडीक्कल आणि लाल रंगाच्या जर्सीचे काहीतरी कनेक्शन आहे.
https://www.instagram.com/p/BzaMSaeDaFB/
कोण आहे देवदत्त पडीक्कल?
देवदत्त पडीक्कलचा जन्म ७ जुलै २००० मध्ये केरळच्या इदप्पलमध्ये झाला होता. त्यानंतर काही कारणास्तव त्याच्या कुटुंबाने बंगळुरुमध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला होता. बंगळुरुमध्ये त्याने कर्नाटक इन्स्टिट्युट ऑफ क्रिकेटमध्ये क्रिकेटचे धडे गिरवले होते. त्याने कर्नाटक संघासाठी १६ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
देवदत्त पडीक्कलची क्रिकेट कारकीर्द
देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्त पडीक्कलने वयाच्या १७ व्या वर्षी कर्नाटक प्रीमियर लीग स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने बेलरी टस्कर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच २८ नोव्हेंबर २०१८ रोजी त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले होते. विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत त्याने धावांचा पाऊस पाडला होता. त्याने या हंगामात खेळलेल्या ७ सामन्यात ७३७ धावा केल्या होत्या. यात त्याने ४ शतक झळकावले होते.
त्याने आत्तापर्यंत १५ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ९०७ धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने २० सामने खेळले आहेत. यात त्याने १३८७ धावा केल्या आहेत. तर ३६ टी२० क्रिकेट सामन्यात १४०८ धावा केल्या आहेत.
आयपीएल सुरू होण्यापूर्वी झाला होता कोरोना
आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती. २२ मार्चला त्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याला त्यानंतर काही दिवस विलग्नवासात ठेवण्यात आले होते. त्यानंतर कोरोनातून पूर्णपणे बाहेर आल्यानंतर, तो पुन्हा संघाला जोडला गेला होता. परंतु त्याला मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या –
चक्क मँचेस्टर सिटीच्या मॅनेजरने मानले विराट कोहलीचे आभार, ‘हे’ होते कारण
थरारक लढतीत झिम्बाब्वेची कमाल! पाकिस्तानला अवघ्या ९९ धावांवर ऑल आउट करत मिळवला ऐतिहासिक विजय