भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने एक नवीन डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओला चाहते मोठ्या प्रमाणावर शेअर आणि व्हायरल देखील करत आहेत.
सोनाक्षी सिन्हाच्या गाण्यावर केला डान्स
धनश्री वर्मा डान्ससाठी सॉफ्ट म्युजिकची निवड केली आहे. धनश्रीने सलवार सूटमध्ये डान्स केला आहे. धनश्रीने सोनाक्षी सिन्हाचे ‘लुटेरा’ या चित्रपटातील ‘संवार लू’ हे गाणं डान्ससाठी निवडले आहे. या गाण्यावर तिने उत्कृष्ट डान्स केला आहे. लुटेरा या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा बरोबर अभिनेता रणवीर सिंग आहे. तर हे गाणं प्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूरने आपल्या मधुर आवाजात गायले आहे
पारंपरिक पोशाख परिधान
धनश्रीने ग्रे रंगाचा कुर्ता आणि शाईनी पांढऱ्या रंगाचा पजामा घातला आहे. धनश्रीने परिधान केलेल्या या पारंपरिक पोशाखामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. लूक पूर्णपणे साध्या रुपात केला आहे. तर कानामध्ये मोठ्या ईयररिंग घातल्या आहेत. एका हातामध्ये ब्रेसलेट घातले आहे आणि केसांची कोणतीही स्टाईल न करता केस मोकळे सोडले आहेत.
https://www.instagram.com/p/CQYjfRkpoc8/
धनश्रीच्या या अंदाजाला खूप पसंती
धनश्रीच्या नवीन अंदाजला चाहते खूप पसंद करत आहेत. धनश्री नेहमी रॅप किंवा डिस्को गाण्यावर डान्स करताना आपल्या सर्वांना दिसून आले आहे. परंतु धनश्रीने या व्हिडीओमध्ये तिचे नवीन कौशल्य दाखवले आहे. धनश्री सध्या हरियाणामधील गुरुग्राम येथील घरी राहत आहे. आशा आहे की, धनश्री देखील युजवेंद्र चहल सोबत श्रीलंका दौऱ्यावर जाईल. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जुलै महिन्यात जाणार आहे. या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. तर मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड देखील या दौऱ्यावर जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी पदार्पणात द्विशतक ठोकणाऱ्या कॉनवेवर ‘या’ आयपीएल संघांची नजर, लावतील कोट्यावधींच्या बोली
आठवणीतील सामना: दोन वर्षांपूर्वी शमीने हॅट्रिक घेत संपविला होता ३२ वर्षाचा दुष्काळ
पाकिस्तान संघाला जबर धक्का, टी२० विश्वचषक २०२२पर्यंत करारबद्ध असलेल्या प्रशिक्षकाने घेतली माघार