भारतीय संघाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या आयुष्यात सर्वकाही ठीक आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या नात्यात काहीतरी बनसले आहे, अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर या दोघांनीही या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले होते. आता धनश्रीने या बाबतीत सविस्तर माहिती दिली आहे. तसेच यादरम्यानच्या कालात तिला मोठी दुखापत झाल्याचेही स्पष्ट केले आहे.
धनश्रीने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट करून ही माहिती चाहत्यांना दिली. धनश्री वर्मा (Dhanashree Varma) म्हणाली की, ती डान्स करताना खाली पडली आणि तीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिचे एक लिगामेंट देखील तुटले आहे आणि पुन्हा डान्स करण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. शस्त्रक्रियेनंतर डान्स करण्यासाठी तिला काही महिन्यांचा वेळ लागू शकतो. सध्या ती वेदनेमुळे मोठ्या विश्रांतीवर आहे. घरामध्ये चालन्यासाठी तिला मोठी कसरत करावी लागत आहे.
धनश्रीने सांगितल्याप्रामाणे, सुरुवातील हे स्वीकार करणे कठीण होते की, पुढेच काही महिने ती डान्स करू शकणार नाही. त्यानंतर काही लोकांनी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सोबत तिचे नाते तुटणार असल्याची अफवा पसरवल्या. या बातम्यांना काहीच आधार नव्हता, पण यामुळे तिच्या मनाला वाईट वाटल्याचेही धनश्री म्हणाली.
पोस्टमध्ये तिने पुढे लिहिले की, या घटनेतून ती खूप काही शिकली आहे. आता ती पहिल्यापेक्षा मजबूत आणि समजूतदार बनली आहे. असे असले तरी, या अडचणीच्या काळातून ती लवकरच बाहेर येईल आणि शस्त्रक्रियेनंतर पुन्हा डान्स करू लागेल. पोस्टच्या शेवटी तिने सर्वांना आनंत आणि प्रेम पसरवा, इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा, असा संदेशही दिला.
https://www.instagram.com/p/ChhC-AQJelf/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, धनश्री आणि चहलविषयीच्या अफवांची सुरुवात एका साध्या गोष्टीमुळे झाली. धनश्रीने इंस्टाग्राम खात्यावरून चहलचे नाव काढून टाकले होते. त्यानतंर चहलने देखील “नवीन आयुष्याची सुरुवात होत आहे,” अशा आशयाची स्टोरी शेअर केली होती. या सर्व गोष्टींवरून नेटकऱ्यांना अंदाच बांधला आणि दोघांविषयी अफवा पसरवू लागले. मध्यांतरी धनश्रीने देखील “राजकुमारी तिचे दुःख मजबुतीमध्ये बदलंत असते,” अशी स्टोरी शेअर केली होती. या स्पोरीविषयी देखील तिने स्पष्टीकर दिले. ती म्हणाली, ही स्टोरी तिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे शेअर केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Third ODI: झिम्बाब्वेला व्हाईटवॉश देण्यासाठी भारत सज्ज, २ बदलांसह अशी आहे प्लेइंग इलेव्हन
‘तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे त्यामुळे…’, माजी दिग्गजाने कोहलीबाबत पाकिस्तानी संघाला दिली वॉर्निंग!
रसेलच्या संघाने मोडला उच्चांक! केवळ १०० चेंडूत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ धावा