---Advertisement---

दिनेश कार्तिक आता तमिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाही, ‘हा’ खेळाडू आहे त्याला कारण

On: मंगळवार, ऑगस्ट 10, 2021 1:56 AM
---Advertisement---

दिनेश कार्तिक हा भारतीय संघातील एक प्रतिभाशाली खेळाडू म्हणून ओळखला जातो. महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिक यांची कारकीर्द जवळपास एकाच वेळी सुरु झाली. त्यामुळे कार्तिकला भारतीय संघात जास्त संधी मिळाली नाही. असे असले तरी कार्तिकने वेळोवेळी संघात स्थान मिळाल्यावर चांगली कामगिरी करत आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवून दिले. मात्र कार्तिक सध्या एका वेगळ्याच कौशल्याचे प्रदर्शन करताना दिसत आहे, ते म्हणजे समालोचन.

कार्तिकने भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत समालोचन केले. कार्तिकचे समालोचनातीलही कौशल्य पाहून चाहत्यांनी चांगलेच कौतुक केले. दरम्यान, ३६ वर्षीय कार्तिकने भारतीय संघाकडून २०२१ चा टी-२० विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तसेच भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा सोबत बोलताना, कार्तिकला प्रथम श्रेणी क्रिकेट न खेळण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला, “मी तामिळनाडूसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाही कारण, मी जर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलो तर एन जगदीशन या खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर प्रथम श्रेणी माझे भविष्य नाही.”

कार्तिकला काही सामन्यात फलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान मिळाले होते. परंतु, तो या स्थानाला कायम ठेवू शकला नाही. त्यामुळे तो नेहमी संघात आत-बाहेर होत राहिला.

महेंद्रसिंग धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दिनेश कार्तिकला २०१८ इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, कार्तिक पहिल्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरला. त्यामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. यानंतर अजून पर्यंत कार्तिकला कसोटीमध्ये भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.

महत्वाच्या बातम्या –

शुभमंगल सावधान! न्यूझीलंडचा कोरी अँडरसन चढला बोहल्यावर; लग्नानंतर आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट

ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलेल्या खेळाडूंचे विराट कोहलीने वाढवले मनोधैर्य; म्हणाला…

बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा टी२० मालिकेत ४-१ ने लाजीरवाणा पराभव; अखेरच्या सामन्यात नकोसा विक्रमही नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---