युएस ओपनच्या उपांत्यपूर्व सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनचा 6-3, 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
या सामन्यात मिलमनने रॉजर फेडररला जशी टक्कर दिली तसाच तो जोकोविच विरुद्ध खेळला. यावेळी जोकोविचने 16 ब्रेक पॉइंट वाया घालवले. तरीही त्याने फेडरर जे करू शकला नाही ते त्याने केले.
पहिल्या सेटमध्ये जोकोविच 3-0 असा पुढे असताना मिलमनला सुरू गवसला पण तेव्हा खूप वेळ होऊन गेला होता. तरीही त्याने हार न मानता सामन्यात उत्तम कामगिरी केली. यावेळी त्याने जोकोविचला चांगलेच झुंजवले.
येथील वातावरण उष्ण असल्याचा त्रास फेडररला झाला होता म्हणून तो मिलमन विरुद्ध पराभूत झाला. पण जोकोविचने हा त्रास सहन करत मिलमनचा प्रतिकार केला. तसेच यावेळी जोकोविच आणि मिलमनने अनेक वेळा जर्सी बदलल्या.
मिलमनचा पराभव करत जोकोविच अकराव्यांदा युएस ओपनच्या उपांत्य फेरीत पोहचला आहे. जोकोविचने 2011आणि 2015ला युएस ओपनचे विजेतेपद जिंकले आहे.
जोकोविच उद्या (8सप्टेंबर) होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत केइ निशिकोरीशी भिडणार आहे. तर पहिला उपांत्य सामना राफेल नदाल विरुद्ध जुआन डेन पोट्रो यांच्यात होणार आहे.
जोकोविचने निशिकोरी विरुध्द 14 गेम्स जिंकले असून यामध्ये 2018च्या तीन सामन्यांचाही समावेश आहे. सध्या झालेल्या विम्बल्डनच्या उपांत्यपुर्व सामन्याचाही त्यात समावेश आहे.
2014च्या युएस ओपनच्या उपांत्य सामन्यात निशिकोरीने जोकोविचचा पराभव केला आहे. तसेच जोकाविच 2017च्या युएस ओपनमध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. तर त्याने जुलै महिन्यातच विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–इंडिया ब्ल्यू संघाने जिंकले दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद
–सेरेना विल्यम्स खेळणार नवव्यांदा युएस ओपनच्या अंतिम फेरीत