---Advertisement---

एकेकाळी डिप्रेशनमुळे ढसाढसा रडला होता इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू, आता चेन्नई कसोटीत घेतल्या सर्वाधिक विकेट्स

On: सोमवार, फेब्रुवारी 8, 2021 7:14 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिली कसोटी खेळण्यात येत आहे. या कसोटीतील तिसऱ्या दिवसाखेर भारताने 6 गडी गमावून 257 धावा केल्या. पहिल्या डावात अजून भारतीय संघ 321 धावांनी पिछाडीवर आहे. यादरम्यान इंग्लंडच्या एका युवा फिरकीपटूने चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत या अनुभवी फलंदाजांना तंबूत धाडले आहे. भारतीय संघातील या महत्त्वपुर्ण फलंदाजांच्या विकेट्स काढणारा खेळाडू असून कोण नसून, तो ‘डॉम बेस’ आहे.

या 23 वर्षीय फिरकी गोलंदाजाला भारतीय फलंदाजांसाठी धोक्याची घंटा ठरणार असल्याचे म्हटले जात होते आणि चेन्नई कसोटीत बेस खरोखरच भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या सामन्यात आतापर्यंत बेसने 23 षटके गोलंदाजी करताना 55 धावा देत 4 बळी घेतले आहेत. तो आतापर्यंत या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

पण तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, सध्या उत्तम फॉर्ममध्ये असलेला बेस एकेकाळी डिप्रेशनमुळे ड्रेसिंग रूममध्ये बसून ढसाढसा रडला होता.

ड्रेसिंग रूममध्ये मोठमोठ्याने रडला होता डॉम बेस

बेसने 2018 साली पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात तो एकही बळी टिपू शकला नव्हता. परंतु पुढील दुसर्‍या कसोटी सामन्यात त्याने 3 बळी मिळवले. तथापि त्यानंतर बेसला पुढील 18 महिने आंतरराष्ट्रीय सामना खेळायची संधी मिळाली नाही. यामुळे बेसला नैराश्याने ग्रासले होते. त्यामुळे तो ड्रेसिंग रूममध्ये बसून खूप रडला होता.

2018 साली बेस इंग्लंडचा देशांतर्गत संघ समरसेट संघाकडून सामना खेळत असताना आपल्या फलंदाजीच्या प्रतीक्षेत होता. मात्र याचवेळी संघातील मनोविज्ञान चिकित्सकांशी आपल्या मानसिक स्थितीबद्दल बोलत होता. यादरम्यान बोलताना बेसला रडू आवरले नव्हते. स्वतः बेसनेच या प्रसंगाचा उलगडा एका मुलाखीदरम्यान केला होता. मात्र आता बेस पूर्णतः यातून सावरला असून संघासाठी उत्तम कामगिरी करताना दिसत आहे.

श्रीलंकाविरुद्ध केले होते सर्वाधिक गडी बाद

बेसने नुकत्याच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेतही अविश्वसनिय गोलंदाजी केली होती. त्याने 2 सामन्यात सर्वाधिक 12 बळी मिळवले होते. बेसने आतापर्यंत 12 आतंरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेले असून त्यात त्याने 31 बळी मिळवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

बांग्लादेशविरुद्ध विंडीजला अशक्यप्राय विजय मिळवून देणारा कायले मेयर्स आहे तरी कोण? वाचा संपूर्ण माहिती

आयपीएल २०२१ : ‘या’ खेळाडूला गेली १३ वर्षे कोणत्याच संघाने केले नाही खरेदी, यावर्षी नावच दाखल न करण्याचा घेतला निर्णय

दुसऱ्या कसोटीसाठी चेपॉक स्टेडियमवर १५००० प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती, ‘या’ दिवसापासून सुरु होणार तिकीट विक्री

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---