आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघाला मंगळवारी (6 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध आपला पुढील सामना खेळायचा आहे. त्यानंतर सुपर फोरमधील अखेरचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला जाईल. भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. हे दोन्ही सामने संघासाठी तसेच काही खेळाडूसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये जे खेळाडू अपयशी ठरत आहेत, त्या खेळाडूंवर या सामन्यांमध्ये मोठा दबाव असेल. याच दबावाच्या परिस्थितीत त्यांना आपली कामगिरी उंचावावी लागणार आहे.
आशिया चषक 2022 मध्ये ज्या खेळाडूचे अपयश चांगलेच दिसून आले आहेत तो म्हणजे भारताचा प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल. चहलला आतापर्यंत या स्पर्धेत छाप पाडण्यात अपयश आले आहे. त्याला ना बळी मिळवता आले ना धावा रोखता आल्या.
युजवेंद्र चहलने आशिया चषक 2022 मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तीन सामन्यांमध्ये त्याने 7.75 च्या इकॉनॉमीने धावा देत फक्त एक बळी मिळवला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये चहल चांगलाच महागडा ठरला. चहलने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 8.00 च्या इकॉनॉमीने 4 षटके टाकत 32 धावा दिलेल्या. तर उभय संघांमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने 4 षटकात 10.75 च्या इकॉनॉमीने 43 धावा दिल्या आणि फक्त 1 बळी घेतला.
एकीकडे चहल अपयशी ठरत असताना दुसरीकडे त्याचा पर्याय म्हणून रवी बिश्नोई तयार होताना दिसतोय. पाकिस्तान विरुद्ध त्याने अफलातून कामगिरी केली होती. युवा रवी आपल्या गुगलीमुळे फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी ठरला आहे. तर दुसरीकडे सर्वात अनुभवी रविचंद्र अश्विन हा देखील संघाचा भाग असून, त्याला देखील चहलच्या जागी संधी मिळू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी चार महिने अमेरिकेत प्रशिक्षण- रौप्य पदक विजेता अविनाश साबळे
हार्दिक पंड्या संघाचा पाचवा गोलंदाज बनू शकत नाही, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
‘त्यामुळे’ पाकिस्तानने भारताला मात दिली! गोलंदाजी प्रशिक्षकांनी कमी केले अर्शदीपच्या खांद्यावरील ओझे