सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना ओव्हल मैदानावर सुरू आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आणल्या. यादरम्यान सामन्यात एक अशी घटना घडली जी आता चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.
या मालिकेत कमालीची गोलंदाजी करणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा गुडघा जखमी झाल्याचे दृश्य दिसले. अँडरसनची पॅन्ट गुडघ्याकडील भागाने पूर्ण रक्ताने माखली होती. तरीही अँडरसन गोलंदाजी करत राहिला. ही घटना ४२ व्या षटकावेळी सर्वांच्या लक्षात आली. तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहली ५० धावांवर, तर उपकर्णधार अजिंक्य राहणे ५ धावांवर खेळत होते.
दरम्यान, अँडरसनला ही जखम कधी आणि केव्हा झाली, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, सोशल मीडियावर अँडरसनची पॅन्ट रक्ताने माखलेल्याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. यादरम्यान चाहत्यांनी अँडरसनच्या हिंमतीचे आणि जिद्दीचे कौतुक केले.
https://twitter.com/FourOverthrows/status/1433429576747683844
कदाचीत गोलंदाजीवेळी फोलोअप करताना अँडरसन खेळपट्टीवर पडला असताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अँडरसनने आपली लय देखील गमावली होती. पण, तो दुखापत झाल्यानंतरही गोलंदाजी करताना दिसला होता. ही सर्व घटना कॅमेऱ्यात देखील कैद झाली होती.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1433429331317977089
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1433429187436580870
दरम्यान, नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्यास उतरलेल्या इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची चांगली दमछाक करून सोडली. भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. एक वर्षानंतर इंग्लंड संघामध्ये पुनरागमन करत असलेल्या ख्रिस वोक्सने रोहित शर्माच्या रूपात इंग्लंडला पहिली विकेट मिळवून दिली. तसेच चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविंद्र जडेजा हे फलंदाजही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.
परंतु, यादरम्यान अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीने मात्र, अर्धशतकी खेळी केली. परंतु त्याला त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही आणि ऑली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर तो ५० धावांवर बाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूरने ताबडतोड फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. त्यामुळे भारताला १९१ धावा करता आल्या.
इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर ऑली रॉबिन्सनने ३ विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
–तेंडुलकरनंतर आता पुजारा ठरतोय जेम्स अँडरसनचा नेहमीचा गिऱ्हाईक, ‘इतक्या’ वेळेस केलंय बाद
–वनडे कारकिर्दीच्या सुरुवातीला मधल्या अन् खालच्या फळीत खेळणारे ‘हे’ भारतीय क्रिकेटर, पुढे बनले अव्वल सलामीवीर
–तालिबान्यांना अफगाणिस्तान अन् भारतीय संघामध्ये खेळवायची आहे मालिका, पण बीसीसीआयचं म्हणणं काय?






