टी२० क्रिकेटची सुरूवात झाल्यापासून क्रिकेट विश्वाला एकापेक्षा एक सर्वोत्कृष्ट प्रतिभावान खेळाडू मिळाले आहेत. टी२० क्रिकेट हे क्रिकेट प्रेमींचा सर्वात आवडता प्रकार बनला आहे. जेथे २००५ पासून एकापेक्षा एक जबरदस्त क्रिकेटपटू पहायला मिळत आहेत. ज्यांनी आपला जलवा दाखवला आहे. टी२० क्रिकेट प्रकार आल्यानंतर बर्याच देशांनी आपापल्या टी२० लीग सुरू केल्या आहेत.
जगभरातील खेळाडू या सर्व टी२० क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसतात. त्यापैकी आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्सचा एक खेळाडू देखील आहे, जो आतापर्यंत २० संघांकडून खेळला आहे.
वास्तविक २० वेगवेगळ्या संघांसह खेळणे ही खूप मोठी आणि विशेष गोष्ट आहे. हा खेळाडू खूप खतरनाक आहे, ज्याने या २० संघांकडून खेळताना टी२० क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक बळी मिळवले आहेत आणि ६३०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. हा खेळाडू इतर कोणी नसून ड्वेन ब्राव्हो आहे. ब्राव्हो खरोखरच टी२० क्रिकेट प्रकारातील सर्वात धोकादायक अष्टपैलू खेळाडू आहे.
ब्रावोने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये २० संघांकडून एकूण ४६५ सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ५०६ विकेट्स सह ६३२४ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याच्या २० अर्धशतकीय खेळींचाही समावेश आहे.
या वेस्ट इंडिज अष्टपैलूबद्दल बोलायचं झालं, तर तो टी२० क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे. त्याच्या या विक्रमाच्या आसपास दुसरा कोणताही गोलंदाज नाही. याव्यतिरिक्त ३९० विकेट्स सह लसिथ मलिंगा दुसर्या स्थानावर आहे.
ब्राव्होचे आयपीएलमध्ये पदार्पण हे मुंबई इंडियन्सकडून झाले होते. त्यानंतर २०११ मध्ये त्याची चेन्नई सुपर किंग्स संघात निवड झाली. परंतु तो २०१६ आणि २०१७ वर्षात चेन्नईकडून खेळू शकला नाही, कारण चेन्नईला हे दोन हंगाम निलंबित करण्यात आले होते.
ब्राव्होने चेन्नई सुपर किंग्सकडून आतापर्यंत १०३ सामने खेळले असून त्यामध्ये ११८ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. चेन्नईकडून सर्वाधिक विकेट्स या आर अश्विनच्या नावावर आहेत. त्याने १२० विकेट्स घेतल्या आहेत. जर ब्रावोने अजून ३ विकेट्स घेतल्या तर तो सीएसकेचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. त्याचबरोबर तो आयपीएलमधील आपल्या १५० विकेट्सही पूर्ण करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-दीपक चाहराने १५ वर्षांचा जुना फोटो केला शेअर; शेन वॉट्सनसाठी दिला ‘हा’ खास संदेश
-अखेर ऋतुराज गायकवाड पहिला सामना खेळणार की नाही याचे उत्तर मिळाले
-काय सांगता! वयाच्या २५व्या वर्षीच वैतागून ‘त्याने’ केला क्रिकेटला टाटा बाय बाय
ट्रेंडिंग लेख-
-‘या’ ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल
-पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात
-आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी