भारतीय क्रिकेटमध्ये अनेकवर्षे फलंदाजांचे वर्चस्व राहिलेले दिसले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भारतीय गोलंदाजांनी आपली छाप पाडलेली दिसत आहे. त्यामुळे अनेकदा भारतीय गोलंदाजांचे दिग्गज खेळाडू कौतुक करत असतात. नुकतेच भारताचे माजी वेगवान गोलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्स गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांनी भारतीय गोलंदाजचे कौतुक केले आहे.
बालाजी यांचे असे म्हणणे आहे की, अगोदर भारताच्या लाखो युवा खेळाडूंचे आदर्श दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर आणि रनमशीन विराट कोहली हे होते आणि युवा खेळाडू त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करत असत. परंतु आता तसा काळ राहिला नाही. वेळेनुसार परिस्थिती देखील बदलली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये युवा खेळाडू हे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांच्या सारखे बनण्याचा प्रयत्न करत आहेत.
बालाजी यांनी क्रिकेट नेक्स्टशी बोलताना सांगितले की, “वर्तमान काळात भारतात क्रीडा क्षेत्रात विकसित झाला आहे. 1980 च्या दशकात कपिल देव एक आदर्श म्हणून सर्वांसमोर होते. त्यानंतर आमच्या काळात मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ हे होते. या खेळाडूंनी 1980 आणि 90 च्या दशकात वेगवान गोलंदाजीच्या रूपात संघात आपले स्थान निश्चित केले. मागील पाच ते सहा वर्षात सुरुवात करणाऱ्या खेळाडूंवर एक नजर टाकली तर असे लक्षात येते की, ही संख्या खूप मोठी आहे. या सर्व खेळाडूंकडे सर्वतोपरी मार्ग उपलब्ध आहेत. जर खेळाडू प्रथम श्रेणी संघात किंवा आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत असेल तर त्या घटनेकडे सर्व लक्ष देतात आणि त्याची दखलही घेतात. काही खेळाडू 1980 ते 90 च्या दशकात या सर्व गोष्टींपासून वंचित राहिले होते”.
बालाजी यांनी सांगितले की, अगोदर हे सर्व मार्ग उपलब्ध नव्हते. एक वेगवान गोलंदाज तेव्हाच संघात येऊ शकत होता जेव्हा दुसर्या एखाद्या खेळाडूला दुखापत झाली असेल. त्यांनी सांगितले की, टी20 क्रिकेटच्या प्रारंभामुळे आणि आयपीएलसारख्या स्पर्धांमुळ् वेगवान गोलंदाजाला स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत.
बालाजी यांनी पुढे असेही म्हटले की, वेगवान गोलंदाजांचा एक मोठा वर्ग निर्माण होत आहे आणि त्याचमुळे खेळाडूंकडे आदर्श म्हणून फलंदाजाचा प्रभाव कमी कमी होऊन गोलंदाजाला प्रभाव वाढत आहे. त्यांनी सांगितले की, अगोदर सर्वजण दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर किंवा रण मशीन विराट कोहली बनण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आताचे युवा खेळाडू जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा किंवा उमेश यादव बनण्याचा प्रयत्न करत आहेत.
बालाजी म्हणाला, ‘यापूर्वी 10 पैकी 9 युवा खेळाडूंना विराट किंवा सचिन किंवा धोनी बनायचे होते. पण आजकाल त्यांना बुमराह, शमी किंवा झहीर खान बनायचे आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
‘उशी कुठंय?’ व्यायामाच्या व्हिडियावर युजरने विचारलेल्या प्रश्नाला ईशांत शर्माचे भन्नाट उत्तर
अप्रतिम!! महिला क्रिकेटची वसीम अक्रम, हवेतच चेंडू स्विंग करत उडवल्या दांड्या