---Advertisement---

‘विराटसेना’साठी इंग्लंडकडून खुशखबर! क्वारंटाईन कालावधीत घट, सरावासही मिळणार जास्तीचा वेळ

On: शनिवार, मे 22, 2021 2:13 PM
Team India (Virat Kohli, R Ashwin, Rohit Sharma)
---Advertisement---

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वत्र काळजी घेतली जात आहे. पुढील महिन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. न्यूझीलंड आणि भारत या दोन संघात विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना होणार आहे. १८ ते २२ जून या कालावधीत होणारा हा सामना साउथम्पटनच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यानंतर त्यांना इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पुरुषसंघासोबतच महिलेचा संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघ इंग्लंडला जाण्याअगोदर एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाच्या इंग्लंडमधील विलगीकरणात कालावधीत घट झाली आहे.

भारतीय संघाला इंग्लंडला गेल्यावर 10 दिवस विलगीकरणात राहावे लागणार होते. परंतु बीसीसीआयच्या विनंतीनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने हा कालावधी कमी करत 10 ऐवजी 3 दिवसांवर आणला आहे. याबरोबरच चौथ्या दिवसांपासून भारतीय खेळाडूंना सरावाची परवानगी दिली गेली आहे.

भारतीय पुरुष आणि महिला संघ एकाच विमानातून ब्रिटनला रवाना होणार आहेत. पुरुष संघ पहिल्यांदा साउथम्पटनमध्ये न्यूझीलंडच्या विरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना खेळणार आहे. भारतीय संघ एजेस बाउल हॉटेलमध्ये राहणार आहे. इनसाईड स्पोर्ट्स वृत्तानुसार, त्या वेळी न्यूझीलंडचा संघ पण त्याच हॉटेलमध्ये राहणार आहे. त्याचबरोबर दुसरीकडे भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी ब्रिस्टलला जाणार आहे. हा सामना 16 जूनपासून सुरू होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटचा हुकमी एक्का म्हणतोय, “मी आज जे काही आहे त्यामध्ये माही भाईचा मोठा हात आहे”

टीम इंडियाला सापडली न्यूझीलंडची कमकुवत बाजू, WTC अंतिम सामन्यात उचलणार भरपूर फायदा!

“गाबा कसोटीत पुजारा भारतीय नव्हे तर ऑस्ट्रेलियन फलंदाजाप्रमाणे खेळला,” ऑसी सलामीवीराचे मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---