भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत होता. मात्र, आता त्याने थेट मायदेशाची वाट धरली असून, निलंबित केल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. त्याला निलंबित करण्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
चेतेश्वर पुजारा मागील वर्षीपासून ससेक्स काऊंटी संघाचा कर्णधार आहे. याच कर्णधारपदामुळे त्याला नुकसान सोसावे लागले. लिसेस्टरशायरविरुद्धच्या काऊंटी चॅम्पियनशिपच्या शेवटच्या सामन्यात ससेक्सचे तीन खेळाडू टॉम हेन्स, जॅक कार्सन आणि एरी कार्वेलास यांनी मैदानावर गैरवर्तन केले होते. यामुळे संघाला एकाच हंगामात 4 पेनल्टी मिळाल्या आणि 12 गुणही कापले गेले. पुजाराने ईसीबीचे व्यावसायिक वर्तन नियम मोडले नसले तरी, खेळाडूंनी जे केले त्याची शिक्षाही त्याला भोगावी लागली. डर्बीशायरविरुद्धच्या सामन्यात टॉम आणि जॅकला संघात स्थान मिळणार नाही.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात लिहिले आहे की, 13 सप्टेंबर रोजी लिस्टरशायरविरुद्ध दोन अतिरिक्त पेनल्टी मिळाल्यामुळे ससेक्स संघाला ही शिक्षा देण्यात आली आहे. या सामन्यापूर्वीही ससेक्सच्या खात्यात दोन फिक्स पेनल्टी होत्या. ईसीबीने काउंटी चॅम्पियनशिपमधील खेळाडूंच्या वागणुकीबाबत कठोर नियम केले आहेत. या हंगामात ससेक्सवर 4 वेळा फिक्स्ड पेनल्टी लावण्यात आली आहे. ईसीबीच्या नियमांनुसार, जेव्हाजेव्हा असे होते तेव्हा कर्णधारावर बंदी घातली जाते. ससेक्सने त्याला आव्हान न देता शिक्षा स्वीकारली आहे.
आता हंगामातील संघाचे केवळ दोनच सामने शिल्लक असल्याने, त्यातील एका सामन्यात पुजारा खेळणार नसल्याने, त्याने स्पर्धेतून माघार घेत मायदेशाचा रस्ता धरला. त्याने ट्विट करत आपल्या खेळाडूंना अखेरच्या दोन सामन्यांसाठी शुभेच्छा देताना या हंगामातील आठवणी ताज्या केल्या.
(ECB suspends Cheteshwar Pujara for a match as Sussex receives a 12-point penalty)
महत्वाच्या बातम्या –
मायदेशात परतल्यानंतरही कर्णधार रोहितने जिंकले मन! चाहत्यांसाठी थांबवली आपली मर्सिडीज एस क्लास
बीसीसीआय आणि एनसीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ही! श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संतापला माजी दिग्गज