भारताच्या मोठ्या आणि प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आणि बिग बुल अर्थातच राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी (१४ ऑगस्ट) निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने सगळेच हादरून गेले आहे. नुकतेच त्यांनी एयरलाइन्स सुरू केली आहे. त्यांच्या या एयरलाइन्सचे नाव अकासा एयर असे आहे. त्यांच्या मृत्यूवर क्रिकेटविश्वातून भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि इरफान पठाण यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने ट्वीट करत राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त करणारे ट्वीट केले आहे. यामध्ये त्याने म्हटले, ‘दलाल स्ट्रीटचे बिग बुल या एका युगाचा अंत झाला, राकेश झुनझुनवाला यांचे निधन. त्यांच्या कुंटूब आणि नातेवाईकांना माझी सहानुभूती. ओम शांती.’
End of an Era as the Big Bull of the Dalal Street , #RakeshJhunjhunwala passes away.
Condolences to his family and loved ones. Om Shanti 🙏 pic.twitter.com/3OrVSzU2Ty— Virender Sehwag (@virendersehwag) August 14, 2022
भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) यानेही ट्वीट करत झुनझुनवाला यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले, ‘शेयर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाने धक्का बसला. मी त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातून खूप काही शिकलो आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’
Shocked to hear about passing of Big bull of stock market #rakeshjunjunwala had followed his inspirational journey. May his soul get Profit in after life too 🙏
— Irfan Pathan (@IrfanPathan) August 14, 2022
मागील काही दिवसांपासून झुनझुनवाला हे आजारी होते. त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांनी अकासा एयरलाइन सुरू केली होती. त्याच्या उद्घाटनावेळी ते उपस्थित होते, मात्र त्यांना चालणे अशक्य असल्याने ते व्हिलचेयरवर बसलेले होते.
झुनझुनवाला यांनी कॉलेजच्या दिवसांतच शेयर बाजारमध्ये गुंतवणूकीला सुरूवात केली होती. तेव्हा सेंसेक्स इंडेक्स १५० अकांवर होता तो आता ६० हजारपर्यंत पोहोचला आहे. शेयर बाजारमध्ये बक्कळ पैसे कमावल्यानंतर त्यांनी एयरलाइन्समध्येही उडी घेतली. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटी रुपयांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी संपत्ती असणाऱ्या झुनझुनवाला यांच्या प्रवासाची सुरूवात पाच हजार रूपयांपासून झाली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषक बेंचवर बसून घालवतील ‘हे’ दोन भारतीय खेळाडू! संघात आधीच दिग्गजांची भरमार
Video: मुंबई इंडियन्सच्या युवा फलंदाजाचा ‘द हंड्रेड’मध्ये कहर, सलग ४ चेंडूंवर ठोकले षटकार