इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या सामन्यात विश्रांती दिली गेली असून मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह या सामन्यात खेळणार नाही, असे नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहितने स्पष्ट केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद सिराजने मात्र त्याच्या पहिल्याच षटकात दोन मोठ्या विकेट्स मिळवल्या. जॉनी बेयरस्टो आणि जो रुट या दिग्गजांना सिराजने डावातील दुसऱ्या षटकात शून्य धावांवर तंबूत माघारी धाडले.
इंग्लंडविरुद्धचा हा तिसरा एकदिवसीय सामना रविवारी (१७ जुलै) खेळला खेळला गेला. मालिकेतील पहिला सामना भारताने १० विकेट्स राखून जिंकला होता. पण दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मात्र भारताला १०० धावांच्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला होता. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका १-१ अशा बरोबरीवर असल्यामुळे हा तिसरा सामना निर्णायक ठरला.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या सामन्यात सहभागी नसल्यामुळे मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याला संघात संधी दिली गेली. सिराज डावातील दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आला आणि दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. मोठ्या काळानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सिराजने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि जो रुट (Joe Root) यांना सिराजने खातेही खोलू दिले नाही. इंग्लंडची धावसंख्या १२ असताना त्यांनी या दोन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हान –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंड: जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टोप्ले
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तब्बल ९७ वर्षानंतर कसोटीमध्ये झाली पुनरावृत्ती, श्रीलंकेच्या गोलंदाजाचा धूमाकुळ कायम
‘जेव्हा विराट फॉर्ममध्ये येईल, तेव्हा…’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
शेवटच्या निर्णायक वनडे सामन्यात नशीब भारताच्या बाजूने, नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय