इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे पाचवा कसोटी पार पडला आहे. मालिका निर्णायक असलेल्या या सामन्यात यजमान संघाने भारताला ७ विकेट्सने पराभूत केले आहे. यामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली आहे. जो रुट (Joe Root) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांनी चौथ्या दिवशी प्रमाणेच आजही उत्तम खेळ करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भुमिका निभावली आहे. यामध्ये रूटने या सामन्यातील पहिले आणि बेयरस्टोने या सामन्यातील दुसरे शतक झळकावले आहे.
रुट पहिल्या डावात ३१ धावांची खेळी करत बाद झाला होता. या सामन्यात त्याने दुसऱ्या डावात झंझावाती सामना विजयी शतक केले आहे. त्याने ६७व्या षटकामध्ये मोहम्मद सिराजच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीतील २८वे शतक ठोकले आहे. त्याने १३६ चेंडूतच हे शतक पूर्ण केले आहे.
रुटचे हे भारताविरुद्ध कसोटीमधील ९वे शतक ठरले आहे. भारताविरुद्ध सर्वाधिक शतकी खेळीचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. त्याबरोबर त्याचे हे या मालिकेतील चौथे शतक ठरले आहे. या सामन्यात त्याने १७३ चेंडूत नाबाद १४२ धावा केल्या आहेत.
बेयरस्टोने इंग्लंडच्या पहिल्या डावात शतकी खेळी करत संघाला फॉलोऑनपासून वाचवले होते. त्याने दुसऱ्या डावातही शतकी खेेळी केली आहे. त्याने जडेजा गोलंदाजी करत असलेल्या ७५व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले आहे. यामध्ये त्याने १४५ चेंडूत नाबाद ११४ धावा केल्या आहेत.
AGAIN!!! 💯😍
Scorecard/Clips: https://t.co/jKoipFmvoB
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/2ep47JN4Og
— England Cricket (@englandcricket) July 5, 2022
उजव्या हाताने या फलंदाजी करणाऱ्या बेयरस्टोने या सामन्याच्या पहिल्या डावात १४० चेंडूत १०६ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने १४ चौकार आणि २ षटकार मारले होते.
भारताच्या ३७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. ऍलेक्स लीस आणि झॅक क्राउले यांच्या पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. हे दोघे बाद झाल्यावर ओली पोपदेखील शून्यावर बाद झाला. त्यानंतर रूट आणि बेयरस्टो या जोडीने मैदानावर तळ ठोकला. दोघांनीही बचावात्मक फलंदाजी करत चौथ्या दिवसाखेर चौथ्या विकेटसाठी अभेद्य दीडशतकी भागीदारी रचली होती.
आज (५ जुलै) पाचव्या दिवशी चांगली सुरूवात करत रूट-बेयरस्टो जोडीने २६९ धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. त्यांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अप्रतिम शॉट्स खेळले आहेत. दोघांनीही ७५ पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
या सामन्यात भारताचे नेतृत्व जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) करत आहे. भारताने पहिल्या डावात ४१६ आणि दुसऱ्या डावात २४५ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवरच संपुष्टात आला तर दुसऱ्या डावामध्ये त्यांनी ३ विकेट्स गमावत ३२५ धावा केल्या आहेत.
या मालिकेतील पहिले चार सामने भारत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळले होते. त्यावेळी भारत २-१ असा पुढे होता. त्यावेळी रुट हा इंग्लंडचा कर्णधार होता. या शेवटच्या सामन्यासाठी दोन्ही संघांचे कर्णधार बदलले असून इंग्लंडचा संघ बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डची मोठी डील! पुढील पाच वर्षांमध्ये खेळाडूंना मिळणार ‘इतके’ कोटी
कोहलीनंतर आता अँडरसनबद्दल बोलताना सेहवागची घसरली जीभ, म्हणाला ‘आता तो म्हातारा झालाय’
कोहली भारी का बाबर? पत्रकाराच्या प्रश्नावर बाबरचे हास्यास्पद उत्तर, पाहा व्हिडिओ