दरम्यान एजबस्टन कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभी केली. शेवटच्या शटकांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार बनवले गेलेल्या बुमराहने ताबडतोड फलंदाजी केली. अवघ्या १६ चेंडूत बुमराहने ३१ धावा केल्या. स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेल्या ८४ व्या षटकात बुमराहने २ षटकार आणि ४ चौकार मारले. षटकातील ५ वाईड आणि एका नो बॉमुळे हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरले.

उभय संघातील ही कसोटी मालिका मागच्या वर्षी सुरू झाली होती, पण कोरोनाच्या कारणास्तव पूर्ण होऊ शकली नव्हती. संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये कोरोनाने शिरकाव झाल्यानंतर मालिकेतील शेवटचा सामना रद्द केला गेला होता. आता हाच सामना १ जुलैपासून पुन्हा एकदा खेळला जात आहे. बुमराहने या मालिकेत भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली असून फलंदाजीतही चांगले प्रदर्शन केले. त्याने मालिकेत आतापर्यंत ११८ धावा केल्या आहेत आणि शेवटच्या डावात देखील त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

पॉवेलच्या झंझावाती अर्धशतकाने बांग्लादेशचा दारुन पराभव, फक्त ‘एवढ्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी

सुनील गावसकरांनंतर ३६ वर्षांनी एकटा चेतेश्वर पुजारा करू शकला ‘ही’ कामगिरी, वाचा सविस्तर

आयपीएलचे चाहते लयंच वाढीव राव! भारताच्या कसोटी सामन्यातही करतायत मुंबई अन् आरसीबीची नामघोष