---Advertisement---

इंग्लंडची टॉप ऑर्डर भारतीय आक्रमणासमोर ठरली निष्प्रभ; माजी क्रिकेटरने सांगितले यामागचे कारण

On: मंगळवार, ऑगस्ट 10, 2021 9:29 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील नॉटिंघममध्ये पार पडलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्यात इंग्लंडची वरची फळी पूर्णपणे अपयशी ठरला, ज्यामुळे यजमान पराभवाच्या उंबरठ्यावर होते. मात्र, इंद्र देवतेच्या कृपेमुळे सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आणि इंग्लंड मालिकेत मागे राहण्यापासून वाचला. दरम्यान, भारताचे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांनी इंग्लंडच्या वरच्या फळीतील फलंदाजांच्या अपयशाचे कारण सांगितले आहे. दोन्ही संघांमधील दुसरी कसोटी गुरुवार (12 ऑगस्ट) पासून लॉर्ड्सवर खेळली जाईल.

पहिल्या कसोटीत इंग्लंडचे वरच्या फळीतील तीन फलंदाज जॅक क्रॉली, डॉम सिबली आणि रोरी बर्न्स यांना मोठ्या आकडी धावा करता आल्या नाहीत. क्रिकबझने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये झहीरने प्रश्नांची उत्तरे देताना इंग्लंडच्या पहिल्या तीन फलंदाजांच्या अपयशाचे कारणही दिले आहे.

“इंग्लंडचे अव्वल तीन फलंदाज, सिबली, बर्न्स आणि क्रॉली यांच्यात काही उणिवा आहेत. कारण त्यांच्या डावात गती नव्हती. बॅक लिफ्ट नीट काम करत नव्हते. तिघांकडे वेगवान गोलंदाजांचा सामना करण्याचे चांगले तंत्र नव्हते. याचमुळे ते वेगाने धावा काढू शकले नाहीत,” असे त्याने सांगितले.

पहिल्या कसोटीत भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी फक्त 157 धावा करायच्या होत्या. मात्र, सततच्या पावसामुळे पाचव्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ शक्य नव्हता. टी-ब्रेकनंतर पंचांनी मैदानाची पाहणी केली आणि सामना संपल्याचे घोषित करण्यात आले.

पहिल्या कसोटीत भारताच्या चार वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर माजी वेगवान गोलंदाज झहीर खूप खूश झाला आहे. ट्रेंट ब्रिजवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय कर्णधार विराट कोहली चार वेगवान गोलंदाजांसह उतरला होता आणि रवींद्र जडेजा हा संघातील एकमेव फिरकी गोलंदाज होता. त्याचवेळी शार्दुल ठाकूरची प्लेइंग इलेव्हनमध्ये चौथा गोलंदाजी पर्याय म्हणून निवड करण्यात आली.

याबद्दल झहीर म्हणाला की, “भारताने चार वेगवान गोलंदाज खेळवले आणि ठाकूरच्या रुपात वेगवान गोलंदाजी अष्टपैलूची निवड केली आणि ते खूप प्रभावी होते. भारतासाठी आणखी एक सकारात्मक गोष्ट म्हणजे डावाच्या निर्णायक वेळी जडेजाने अर्धशतक झळकावले होते.”

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंडने टी२० विश्वचषकाच्या संघातून बाहेर केल्यानंतर ३ शतकं केलेला खेळाडू म्हणतोय, ‘कदाचीत मी अखेरचा सामना खेळलोय’

तब्बल ताशी १६१.१ किमी वेगाने चेंडू टाकणारा ‘हा’ ऑसी खेळाडू सांभाळणार अफगाणिस्तानचे गोलंदाजीचे प्रशिक्षकपद

राहुल द्रविडकडून जाणार एनसीए संचालकपद? बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---