पुढील महिन्यातील ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी इंग्लंडने त्यांचा संघ घोषित केला आहे. या दौऱ्यामध्ये तीन वनडे (Aus Vs Eng) सामन्यांचा समावेश आहे. या संघात सध्या टी20 विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. मात्र, संघात काही महत्वपूर्ण बदल देखील करण्यात आले आहेत. टी20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यात असमर्थ राहिलेला सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy ) संघात पुनरागमन करण्यात यशस्वी झाला आहे. याशिवाय डेविड मलान (Dawid Malan), सॅम बिलिंग्स (Sam Billings), आणि जेम्स विन्स (James Vince) यांना संघात जागा मिळाली आहे.
We have named a 15-strong squad for the three-match ODI series against Australia starting in November 🏏🏴
More here: https://t.co/1S4IJSv1Py pic.twitter.com/9RHsBI9C3Q
— England Cricket (@englandcricket) October 25, 2022
इंग्लंडच्या निवडसमितीने या मालिकेसाठी मजबूत संघ निवडला असून, वनडे संघासाठी निवडलेल्या 15 खेळाडूंपैकी 11 खेळाडू ऑस्ट्रेलियात उपस्थित आहेत. संघात पुनरागमन करणारे विन्स आणि बिलिंग्स या दोघांनी त्यांचा शेवटचा सामना मागच्यावर्षी जुलै, 2021 मध्ये खेळलेला. तसेच ओली स्टोन (Olly Stone) आणि ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) यांची निवड आश्चर्यचकित करणारी आहे. स्टोनने आतापर्यंत फक्त 4 वनडे सामने खेळले आहेत. त्याने शेवटचा वनडे सामना 2018 मध्ये खेळलेला. जॉर्डन मागच्या काही वर्षात टी20 स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून उदयास आला आहे.
संघात निवड झालेल्या खेळाडूंपैकी ल्यूक वुड (Luke Wood) हा एकमात्र अनकॅप्ड खेळाडू आहे. नेदरलँड्स दौऱ्यावर त्याची निवड झालेली, मात्र त्याला पदार्पण करता आले नव्हते. विश्वचषकात ल्यूकला टायमल मिल्स (Tymal Mills) याच्या जागी राखीव गोलंदाज सामील केलेले आहे. लवकरच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याला प्रयाण करेल. रिस टॉपली (Reece Topley) हा दुखापतग्रस्त झाल्यामुळे मिल्सला टी20 विश्वचषकाच्या मुख्य संघात सामील केले गेले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ : जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, सॅम बिलिंग्स, सॅम करन, लियाम डॉसन, ख्रिस जॉर्डन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, फिल सॉल्ट, ओली स्टोन, जेम्स विन्स, डेविड विली, ख्रिस वोक्स, ल्यूक वुड.
ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड वनडे सामन्यांचे वेळापत्रक :
17 नोव्हेंबर-पहिला वनडे सामना, ऍडलेड
19 नोव्हेंबर- दुसरा वनडे सामना, सिडनी
23 नोव्हेंबर- तिसरा वनडे सामना, मेलबर्न
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या यशाने शास्त्रींचा आनंद गगनात मावेना; म्हणाले, “त्याने आता सर्वांची…”
पाकिस्तानला धूळ चारून भारतीय संघ सिडनीत दाखल, नेदरलंडसोबत खेळायचा आहे पुढचा सामना