भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला काल (१३ फेब्रुवारी) पासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी ६ बाद ३०० धावांवर आपला डाव पुढे सुरु केला. मात्र यात केवळ २९ धावांची भर त्यांना घालता आली. त्यामुळे ३२९ धावांवर भारताचा पहिला डाव आटोपला.
मात्र यासह इंग्लंडच्या संघाने ६६ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. इंग्लंडच्या संघाने या डावात एकही अवांतर धाव दिली नाही. त्यामुळे एकही अवांतर धाव न देता उभारलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली.
भारतालाच टाकले मागे
इंग्लंडच्या संघाने तब्बल ६६ वर्षांनी हा विक्रम मोडला. याआधी हा विक्रम भारतीय संघाच्याच नावावर होता. १९५५ मध्ये भारतीय संघाविरुद्ध पाकिस्तानने लाहोर येथील सामन्यात ३२८ धावा केल्या होत्या. त्यावेळी भारतीय गोलंदाजांनी एकही अवांतर धाव दिली नव्हती. मात्र आज भारतीय संघाने ३२९ धावा केल्याने इंग्लंडने हा विक्रम मोडला.
England break a 66-year-old record in Test cricket!
India's 329 in Chennai is the highest innings total without any extras #INDvENG pic.twitter.com/SQBiZZEUxb— ESPNcricinfo stats (@ESPNcric_stats) February 14, 2021
इंग्लंडच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करताना एकही नो बॉल अथवा वाइड बॉल टाकला नाही. तसेच लेग बाईजची देखील एकही अवांतर धाव दिली नाही. अर्थात यात इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फोक्सच्या चांगल्या यष्टिरक्षणाचाही मोलाचा वाटा होता.
England bowled 95.5 Oves and conceded 0 Extras.
Credit to bowlers and massive credit to Ben Foakes especially on this crumbling track.
— Broken Cricket (@BrokenCricket) February 14, 2021
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास दुसऱ्या दिवशी ६ बाद ३०० धावांवर सुरुवात केलेल्या भारताचा डाव ३२९ धावांवर संपुष्टात आला. रिषभ पंतने अर्धशतक झळकावत भारताचा डाव लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक ४ बळी घेतले.
मात्र त्यानंतर इंग्लंडची सुरुवात देखील अडखळत झाली. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यामुळे पहिले सत्र संपले तेव्हा इंग्लंडने ३९ धावांवर ४ गडी गमावले आहेत. आर अश्विनने २ तर अक्षर पटेल आणि इशांत शर्माने प्रत्येक एक बळी पटकावला.
महत्वाच्या बातम्या:
रिषभ पंतची फलंदाजीत बल्ले बल्ले! मागील ८ कसोटी डावात केलीत तब्बल ४ अर्धशतके
Valentines Day Special : ३ महिला क्रिकेटपटू, ज्यांनी केले आहे महिला क्रिकेटपटूंशीच लग्न