ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिका (Ashes Series) सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलिया संघाने कसोटी मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघातील खेळाडू चांगली कामगिरी करतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु, इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. ज्यामुळे इंग्लंड संघाच्या नावे नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. परंतु त्यांना या संधीचा लाभ घेता आला नाही. पहिल्या डावात हसीब हमिद १० चेंडू खेळून शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता. तर दुसऱ्या डावात इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर फलंदाज एकेरी धाव करत माघारी परतले.
यासह इंग्लंड संघाने नको असलेल्या विक्रमाच्या यादीत अव्वल स्थान गाठले आहे. एकाच वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज सर्वाधिक वेळेस एकेरी धाव करून माघारी परतले आहेत.
इंग्लंड संघातील सलामीवीर फलंदाज २०२१ वर्षात पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. तब्बल ३१ वेळेस इंग्लंडचे फलंदाज एकेरी धावा करत माघारी परतले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी भारतीय संघ आहे. १९८३ मध्ये भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज २८ वेळेस एकेरी धाव करत माघारी परतले होते, तर तिसऱ्या स्थानी वेस्ट इंडिज संघ आहे. २००० साली वेस्ट इंडीज संघातील फलंदाज २६ वेळेस तर, १९९८ साली दक्षिण आफ्रिका संघातील फलंदाज २३ वेळेस आणि १९८६ मध्ये इंग्लंड संघातील फलंदाज २१ वेळेस एकेरी धाव करत माघारी परतले होते.
एका कॅलेंडर वर्षात कसोटीत सर्वाधिक वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होणारे सलामीवीर-
३१ वेळेस – इंग्लंड , २०२१*
२८ वेळेस – भारत , १९८३
२६ वेळेस – वेस्ट इंडिज, २०००
२३ वेळेस – दक्षिण आफ्रिका, १९९८
२१ वेळेस – इंग्लंड, १९८६
महत्वाच्या बातम्या :
“वनडे आणि कसोटी संघासाठी वेगवेगळे कर्णधार असणे योग्य”, रवी शास्त्रींची मोठी प्रतिक्रिया
SAvsIND, 1st Test, Live: दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच पावसाचा अडथळा; खेळ उशीराने होणार सुरू
हे नक्की पाहा : त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट