ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा विजेता इंग्लंड संघ ठरला. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तान संघाची 5 विकेट्सने दाणादाण उडवत हा विश्वचषक आपल्या नावावर केला. हा इंग्लंडचा दुसरा टी20 विश्वचषक विजय होता. यापूर्वी त्यांनी 2010मधील टी20 विश्वचषकात पॉल कॉलिंगवूड याच्या नेतृत्वाखाली पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता. इंग्लंडला 2022चा टी20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघात असे काही खेळाडू होते, ज्यांनी 2019चा वनडे विश्वचषकही इंग्लंडला जिंकून दिला होता.
टी20 विश्वचषक 2022च्या अंतिम सामन्याबद्दल थोडक्यात
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानने 8 विकेट्स गमावत 137 धावा कुटल्या होत्या. पाकिस्तानचे 138 धावांचे आव्हान इंग्लंडने 19 षटकात 5 विकेट्स गमावत सहजरीत्या पार केले. तसेच, हा विश्वचषक आपल्या नावावर केला.
ON TOP OF THE WORLD 🦁 pic.twitter.com/CrpaPCfx1o
— England Cricket (@englandcricket) November 13, 2022
वनडे विश्वचषक 2019 आणि टी20 विश्वचषक 2022 दोन्ही स्पर्धेत सहभागी असलेले इंग्लंडचे खेळाडू
या स्पर्धेत इंग्लंडला विजय मिळवून देणाऱ्या संघात सहा खेळाडू असे होते, जे 2019च्या वनडे विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाचाही भाग होते. ते खेळाडू इतर कुणी नसून जोस बटलर, मोईन अली, आदिल रशीद, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड यांचा समावेश होता.
या खेळाडूंपैकी 2022च्या टी20 विश्वचषकात कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने सर्वोत्तम प्रदर्शन केले. बटलर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला. त्याने 6 सामने खेळताना 45च्या सरासरीने 225 धावा चोपल्या. यामध्ये 2 अर्धशतकांचाही समावेश होता. तसेच, नाबाद 80 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. तसेच, बेन स्टोक्स (Ben Stokes) यानेही शानदार फलंदाजी केली. त्याने 6पैकी 5 डावात फलंदाजी करताना 36.66च्या सरासरीने 110 धावा चोपल्या. मोईन अली (Moeen Ali) याला गोलंदाजीत विकेट मिळाली नाही, पण त्याने 5 डावात फलंदाजी करताना 57 धावांचे योगदान दिले.
उर्वरित खेळाडूंपैकी मार्क वुड (Mark Wood) याने गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 4 डावांमध्ये 9 विकेट्स घेतल्या. आदिल रशीद (Adil Rashid) याने 6 डावात 4 विकेट्स, स्टोक्सने 6 डावात 6 विकेट्स आणि ख्रिस वोक्स (Chris Woakes) याने 6 डावात 5 विकेट्स घेतल्या. (England Players to be part of winning both 2019 WC & 2022 T20 WC)
इंग्लंडचे 2019 वनडे विश्वचषक आणि 2022 टी20 विश्वचषकात सहभागी खेळाडू
जोस बटलर
मोईन अली
आदिल रशीद
बेन स्टोक्स
ख्रिस वोक्स
मार्क वूड
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी सांगतो ना तो पुढच्या 10 वर्षात टी20 गाजवेल’, भारताच्या माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी
तब्बल सहा वर्षांनी स्मिथने जुना फॉर्म मिळवला, नाबाद 80 धावा कुटल्यानंतर दिली खास प्रतिक्रिया